महाराष्ट्र

सर्दीने नाक वारंवार बंद होत असल्यास आजमावा हे उपाय

Share Now

Nose

हवामान बदलत असताना सर्दी पडसे होणे ही सर्वसामान्य समस्या आहे. या समस्येच्या जोडीने उद्भविणारी आणखी एक समस्या म्हणजे सर्दीमुळे नाक बंद होऊन श्वासोछ्वासास त्रास होणे. नाक मोकळे होण्यासाठी अनेक औषधे बाजारामध्ये उपलब्ध असली, तरी यांच्या वापरामुळे नाक अतिशय कोरडे पडते. क्वचित नाक खूपच कोरडे पडून त्यातून रक्त येण्यासारख्या समस्या ही उद्भवतात. त्यामुळे अशा औषधांचा वापर मर्यादित प्रमाणात करून, बंद असलेले नाक मोकळे करण्याकरिता काही घरगुती उपायांचा अवलंब करता येऊ शकेल.

सर्दी झाल्यावर नाकातील टिश्यू आणि रक्तकोशिकांना सूज आल्याने नाक बंद होते. ही समस्या काही दिवसांनी आपोआप ठीक होणारी असली, तरी जो पर्यंत ही समस्या टिकून राहते तो पर्यंत व्यक्ती अस्वस्थ होत राहते. हवापालट झाल्याने होणारे सर्दी-खोकला, एखादी अॅलर्जी, नाकाच्या आतमध्ये झालेली टिश्यूची अतिरिक्त वाढ, किंवा सायनसचा सातात्याने होणारा त्रास या कारणांमुळे नाक बंद होण्याची समस्या उद्भवते. नाक बंद होण्याच्या जोडीने क्वचित डोके जड होणे, कान दुखणे, घसा खवखवणे, खोकला, छातीमध्ये हलकी वेदना, आणि बारीक ताप याही समस्या पहावयास मिळतात.

बंद असलेले नाक मोकळे करण्यासाठी काही घरगुती उपाय अतिशय प्रभावी ठरतात. यासाठी आपल्या आहारामध्ये काही पदार्थांचा समावेश करता येईल. जी मंडळी मांसाहारी आहेत त्यांनी सर्दी झालेल्या दिवसांमध्ये गरमागरम चिकन सूप घ्यावे. तसेच आपल्या आहारामध्ये लसूण समाविष्ट करावा. लसूण कच्चा खावा, किंवा ज्यांना हे शक्य नसेल, त्यांनी रोजच्या भाजी-आमटीमध्ये लसूण वापरावा. नाक बंद असल्यास गरम पाण्यामध्ये लसुणाच्या पाकळ्या घालून त्या पाण्याने वाफ घेतल्याने आराम पडतो.

सतत सर्दी होऊन नाक बंद होत असल्यास टोमॅटोच्या रसाच्या सेवनाने ही लाभ होतो. हा रस बनविण्यासाठी चार पाच टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यावेत आणि मिक्सर वर वाटून घ्यावेत. या रसामध्ये एक टेबलस्पून बारीक चिरलेली लसूण आणि चवीपुरते मीठ घालावे. या रसाचे सेवन दिवसातून दोनदा करावे. यामुळे सायनसमुळे नाक बंद होत असल्यास ही समस्या पुष्कळ अंशी कमी होते. याचबरोबर आपल्या आहारामध्ये कांदे, हिरव्या मिरच्या यांचा ही समवेश असावे. या सर्व पदार्थांमध्ये क जीवनसत्व मुबलक प्रमाणामध्ये असून हे इन्फेक्शन कमी करणारे आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविणारे आहेत. सर्दी झालेल्या दिवसांमध्ये मटन, केळी, मैद्याचे किंवा अन्य प्रोसेस्ड अन्नपदार्थ टाळावेत.

नाक बंद असल्यास गरम पाण्यामध्ये पेपरमिंट ऑईलचे दोन तीन थेंब टाकून त्याची वाफ घेतल्याने आराम पडून शकतो. त्याचप्रमाणे तुळशीच्या पानांचा काढा ही यावर चांगला उपाय आहे. यासाठी एक कप पाणी उकळून घेऊन त्यामध्ये तुळशीची काही पाने घालवीत. हे पाणी अर्धे राहीपर्यंत उकळून घेऊन त्यांनर हे पाणी गाळून घ्यावे. त्यानंतर यामध्ये एक चमचा मध आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब घालून हा काढा गरम असताना प्यावा. या काढ्यामध्ये आल्याचा वापरही करता येतील. निलगिरीच्या तेलाचे काही थेंब रुमालावर घालून ते हुंगत राहिल्यानेही बंद नाक मोकळे होते.

The post सर्दीने नाक वारंवार बंद होत असल्यास आजमावा हे उपाय appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/30l20Zk
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!