महाराष्ट्र

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल या मैदानात होणार, गांगुलीकडून शिक्कामोर्तब

Share Now


कोलकाता: अखेर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलचे ठिकाण ठरले असून हा अंतिमफेरीचा सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात 18 ते 22 जूनमध्ये साऊथम्पटनमध्ये खेळवला जाईल. हा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानवर खेळवण्यात येईल, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात होती. पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आणि खेळाडूंची सुरक्षा पाहता अंतिमफेरीचे ठिकाण बदलण्यात आले. याबाबतची घोषणा अद्याप तरी आयसीसीने केली नसली तरी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी मात्र यावर शिक्कामोर्तब केले आहे.

सौरव गांगुली इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले, अंतिम सामना साऊथम्पटनमध्ये होईल. हा निर्णय खूप आधी घेण्यात आला असून हा निर्णय कोरोनामुळे घेण्यात आला. कारण मैदानाजवळच हॉटेल आहे.

एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची जागतिक कसोटी अजिंक्यपदाशी तुलना केली असता गांगुली म्हणाले, प्रत्येकाची आपली खासियत असते. यामध्ये कोरोनामुळे अडचणी आल्या. आम्हा सगळ्या संघाना समान सामने खेळायचे होते. टीम इंडियाच्या मागील 6 महिन्यांच्या कामगिरीवर सौरव गांगुली समाधानी दिसले. खेळाडू मागील सहा महिन्यांपासून बायो-बबलमध्ये आहेत. अंतिम फेरीत आम्ही न्यूझीलंडला हरवू, असा विश्वास गांगुली यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियातील टीम इंडियाचे कामगिरीचेही त्यांनी कौतुक केले. कोहली आणि रहाणेला शुभेच्छा, ब्रिस्बेनमध्ये पंतची खेळीही शानदार होती, अशी प्रतिक्रिया गांगुली यांनी दिली.

मागच्यावर्षी जेव्हा कोरोना उच्चांकावर होता, तेव्हा साऊथम्पटनमध्ये इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानविरुद्ध मालिका खेळवण्यात आली होती. आयपीएलमध्ये टीम इंडियाचे सगळे खेळाडू खेळतात. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या तयारीसाठी खेळाडूंना योग्य वेळ दिला जाईल. त्यासाठी आयपीएलची फायनल 30 मे रोजी होणार आहे.

The post वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल या मैदानात होणार, गांगुलीकडून शिक्कामोर्तब appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/3kXTcSQ
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!