महाराष्ट्र

अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया

Share Now


मुंबई: अमृता फडणवीस यांचे नवे गाणे महिला दिनाच्या मुहूर्तावर रिलीज करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी हे गाणे ऐकल्यानंतर ट्विट करुन प्रतिक्रिया दिली आहे. अमृता फडणवीस यांनी त्यांना मिळालेल्या संधीचा योग्य फायदा उठवला, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.


काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण अमृताताईंनी मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा, असे रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

नेटकऱ्यांना गेल्या अनेक दिवसांपासून उत्सुकता असलेले अमृता फडणवीस यांचे नवीन गाणे सोमवारी रिलीज झाले. नाट्य संगीतावर आधारित ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी.’ हे गाणे सध्या चाहत्यांचा पसंतीस उतरत आहे.

The post अमृता फडणवीसांच्या नव्या गाण्यावर रोहित पवारांची प्रतिक्रिया appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/3epW8WS
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!