महाराष्ट्र

ESIC आपल्या लाभार्थ्यांच्या चांगल्या सुविधेसाठी उघडणार नवे रुग्णालय

Share Now


नवी दिल्ली: आपल्या लाभार्थ्यांना चांगल्या पद्धतीच्या सेवा देण्यात याव्यात, यासाठी कर्मचारी राज्य विमा महामंडळाने अनेक पावले उचलली आहेत. ESIC आरोग्य विमा योजनेच्या लाभार्थ्यांनाही घराजवळील कोणत्याही खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. आरोग्य विमा योजनेतील लाभार्थ्यांच्या घराच्या दहा किमीच्या परिघात जर ईएसआयसी रुग्णालय नसेल तर कर्मचारी राज्य विमा महामंडळात समाविष्ट असलेल्या खासगी रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत.

याबाबत कामगार मंत्रालयाने म्हटले आहे की, राज्य सरकारने जर स्वतःच रुग्णालय चालविण्यावर जोर न दिल्यास नवीन रुग्णालये ESIC द्वारेच चालविली जातील. कर्मचाऱ्यांच्या मागणीनुसार हे पाऊल उचलण्यात आले असून अधिक चांगल्या वैद्यकीय सेवा लाभार्थ्यांना पुरविणे हा त्या मागचा हेतू आहे.

रविवारी कामगार आणि रोजगार राज्यमंत्री संतोषकुमार गंगवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 183 व्या बैठकीत कर्मचारी राज्य विमा महामंडळाने (ESIC) कर्मचाऱ्यांना वैद्यकीय सेवांचा आणि इतर सुविधांचा पुरवठा सुधारण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.

आपल्या सर्व सदस्यांना किंवा लाभार्थ्यांना ESIC ने आणीबाणीच्या काळात जवळ असलेल्या कोणत्याही खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली आहे. विद्यमान प्रणालीअंतर्गत, विमाधारक व्यक्ती आणि लाभार्थी जे ESIC योजनेच्या कक्षेत आहेत, त्यांना ईएसआयसी रुग्णालयात जाणे आवश्यक आहे आणि तेथून बाहेरील किंवा बाहेरील रुग्णालयात उपचार घ्यावे लागतील.

रुग्णालयात एखाद्या लाभार्थ्याला दाखल करणे आवश्यक असल्यास नियुक्त रुग्णालयाने 24 तासांच्या आत लाभार्थ्यांना कॅशलेस आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ईएसआयच्या अधिकृत अधिकाऱ्यांमार्फत ऑनलाईन परवानगी घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात ईएसआयसी मुख्यालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना www.esic.nic.in वर कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) वेबसाईटवर उपलब्ध आहेत.

The post ESIC आपल्या लाभार्थ्यांच्या चांगल्या सुविधेसाठी उघडणार नवे रुग्णालय appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/2OzWQ9b
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!