महाराष्ट्र

…त्यानुसारच #MPSC ची परीक्षाही झाली पाहिजे, रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांना विनंती

Share Now


पुणे : एका परिपत्रकाद्वारे येत्या 14 मार्चला होणारी एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याची घोषणा जाहीर करण्यात आल्यानंतर या निर्णयामुळे परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या आनंदावर विरजण पडले. एमपीएससी परीक्षा यापूर्वीही पुढे ढकलण्यात आल्यामुळे आधीच निराश झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये एकच संतापाची लाट उसळून आली. ‘एमपीएससी’च्या उमेदवारांनी याच रोषातून पुण्यात रस्त्यावर उतरत जोरदार घोषणाबाजी करत राज्य सरकारचा व ‘एमपीएससी’चा तीव्र निषेध व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी याच दरम्यान मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे. कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढे जावे लागेल आणि त्यानुसारच MPSC ची परीक्षाही झाली पाहिजे, असे म्हटले आहे.


आपल्या ट्विटर अकाऊंटवरून रोहित पवार यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. यापुढे कोरोनामुळे कोणतीही गोष्ट न थांबवता कोरोना प्रतिबंधक नियम पाळून आपल्याला पुढे जावे लागेल. त्यासाठी लोकही सहकार्य करतील असा विश्वास आहे. त्यानुसारच #MPSC ची परीक्षाही झाली पाहिजे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अजित पवार आपण याकडे लक्ष द्यावे, ही विनंती!” असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. मागील वर्षभरात कोरोना प्रादुर्भाव आणि मराठा आरक्षणाला मिळालेल्या स्थगितीमुळे एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. पण, या परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना या निर्णयाचा चांगलाच फटका बसला.

The post …त्यानुसारच #MPSC ची परीक्षाही झाली पाहिजे, रोहित पवारांची मुख्यमंत्र्यांना विनंती appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/38wJFwP
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!