महाराष्ट्र

जगप्रसिद्ध वेरुळच्या लेणीतील बुद्ध मूर्तिवर किरणोत्सव

Share Now


​​​​​​​वेरूळ – बुधवारी पर्यटकांसह भाविकांना ऐतिहासिक व धार्मिक पर्यटन असलेल्या वेरूळ लेणीतील दहा नंबरच्या लेणीतील गौतम बुद्धांच्या मूर्तिवर किरणोत्सव सोहळा अनुभवयास मिळाला. एकूण चौतीस लेण्या स्थापत्य कलेचा अद्धभुत नमूना असलेल्या जगप्रसिद्ध वेरूळ लेणीमध्ये आहेत. बारा यामध्ये बौद्ध लेणी आहेत. तर यातील दहा नंबरची बौद्ध लेणी ही चैत्य तर बाकीच्या बौद्ध लेणी या विहार असून यातील दहा नंबरच्या बौद्ध लेणीवर सूर्य उत्तरायणला जात असताना सूर्यकिरणे येत असतात.

मूर्तिच्या चेहऱ्यावरती हीच सूर्यकिरणें बुधवारी आली. हा सोहळा भाविकांसह पर्यटकांना आगामी पाच ते सहा दिवस अनुभवता येईल. महाराष्ट्रातील बौद्ध लेणीतील हा शेवटचा चैत्य असून हा महायानास समर्पित आहे. तर वज्रयाणाची काही शिल्पे यामध्ये पहावयास मिळतात. यालाच सुतार की झोपड़ी किंवा विश्वकर्मा मंदिर ही म्हणतात. तर गुजरातमधील लोक बुद्धालाच विश्वकर्मा समजून येथे नमन करतात. याचा उल्लेख त्यांच्या धार्मिक ग्रंथात ही आहे.

भगवान बुद्ध गुहेत प्रवेश केल्याबरोबरच बोधीवृक्षाखाली ( पिंपळ ) बसलेले दिसत असून धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत बघायला मिळतात. भगवान बुद्धाच्या उजव्या हाताला बोधिसत्व पद्मपाणी व डाव्या हातास बोधिसत्व वज्रपाणी पहावयास मिळतात. तर मागच्या बाजूस स्तूप आहे. लेणीतील छतास गज पृष्ठाकृती आकार दिलेला दिसून येतो. तर समोरच वाद्य मंडप दिलेला असून सकाळी व संध्याकाळी पूर्वीच्या काळी या ठिकाणी ढोल वाजवून आरतीला बोलवण्याची प्रथा आहे.

The post जगप्रसिद्ध वेरुळच्या लेणीतील बुद्ध मूर्तिवर किरणोत्सव appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/3qJawME
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!