मुंबई : एमपीएससी परीक्षासंदर्भात एक मोठी बातमी येत असून येत्या ८ दिवसात एमपीएससी परीक्षा घेण्याची शक्यता आहे. परीक्षा आगामी आठ दिवसात होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर परीक्षेपर्यंत वयोमर्यादा वाढवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आज एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. रास्तारोको करत त्यांनी परीक्षा घेण्याची मागणी केली. 14 मार्च रोजी होणारी परी़क्षा त्यानंतरच्या रविवारी म्हणजेच 21 मार्च रोजी घेणार असल्याची शक्यता आहे.
MPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाबाबत मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांमध्ये चर्चा झाली. थोड्याच MPSC किंवा सरकार वेळात याबाबत भूमिका जाहीर करणार आहे. परीक्षा पुढे ढकलू नये, तर सरकारवर ठरलेल्या तारखेलाच म्हणजे १४ मार्च रोजी घ्यावी यासाठी सर्व स्तरातून दबाव वाढला आहे. मुख्यमंत्री या पार्श्वभूमीवर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यार्थ्यांनी संयम बाळगावा, रस्त्यावर उतरू नये सरकार विद्यार्थ्याच्या भावानांशी सहमत असून लवकरच योग्य निर्णय घेणार असून आंदोलनाची दखल घेतली आहे. पोलिस महासंचालक हेमंत नगराळे यांना विद्यार्थ्यांचे आंदोलन संवेदनशिलतेने हाताळण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज्याची कायदा सूव्यवस्था बिघडू देऊ नका. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, हे पाहता मुख्यमंत्री लवकरच याबाबत घोषणा करणार आहेत.
The post आगामी आठ दिवसात होऊ शकतात एमपीएससी परीक्षा appeared first on Majha Paper.
from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/3t3IfSi
via IFTTT
Add Comment