महाराष्ट्र

गुगल ट्रेंड्समध्ये जसप्रित बुमराहच्या जात, धर्माबद्दलचे प्रश्न ट्रेंडिंगला

Share Now


अनेक अफवांना शांत करत आजच भारताचा आघाडीचा गोलंदाज जसप्रीत बुमराहने गुपचूप लग्नगाठ बांधली. आपल्या लग्नाचे फोटोज 27 वर्षीय बुमराहने सोशल मीडियावर शेअर केले. त्याने त्याला साजेसे असे कॅप्शन देखील दिले. त्याच्यावर सगळीकडून शुभेच्छांचा वर्षावही होत होता.

पण आपण अतिउत्साही भारतीयांनी बुमराहबद्दल लगेच गुगल सर्च करायला सुरुवात केली. आणि बुमराह शिख आहे का? याची शोधाशोध सुरु केली. सध्या हा प्रश्न गुगल ट्रेंडवर ट्रेंडिंग करत आहे.

ही उत्सुकता भारतीयांना लागून राहिली आहे की जसप्रीत बुमराह मूळचा कोण? शीख की आणखी कोण? बऱ्याच जणांनी त्याच्या मूळ गावाबद्दल, त्याच्या जन्मगावाबद्दलही गुगलकडे चौकशी केल्याचे समोर येत आहे. त्याच्या पत्नीबद्दलही काहींनी सर्च केलेले दिसत आहे. त्याचबरोबर तो कोणत्या जातीचा आहे, त्याचा धर्म कोणता, त्याचे आजोबा कोण असेही प्रश्न ट्रेंडिंगला दिसून येत आहेत.

संजना गणेशन हिच्याशी जसप्रीत बुमराहने लग्न केले आहे. सोशल मीडियावर मागील अनेक दिवसांपासून जसप्रीत कोणाशी लग्न करणार, कोणासोबत त्याचे अफेअर सुरु आहे याबद्दलच्या भरपूर चर्चा होत होत्या. एका दाक्षिणात्य अभिनेत्रीशीही त्याचे नाव जोडले जात होते, पण या चर्चांना आज पूर्णविराम लागला आहे.

The post गुगल ट्रेंड्समध्ये जसप्रित बुमराहच्या जात, धर्माबद्दलचे प्रश्न ट्रेंडिंगला appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/3bOBEFx
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!