महाराष्ट्र

हेल्मेट न घातल्यामुळे चक्क ट्रक चालकावर कारवाई

Share Now


ओडिशा – परिवहन विभागाचा भोंगळ कारभार ओडिशाच्या गंजम जिल्ह्यातून समोर आला आहे. एका ट्रक चालकाला येथील परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी चक्क हेल्मेट न घातल्यामुळे दंड ठोठावला असून सध्या परिवहन विभागाच्या या भोंगळ कारभाराची चांगलीच चर्चा होत आहे.

परिवहन विभागाच्या कार्यालयात गंजम जिल्ह्यातील प्रमोद कुमार हे वाहन परमिट नूतनीकरणासाठी गेले होते. त्यावेळी त्यांना तुझी गाडी क्रमांक OR-07W/4593 च्या नावे एक चलान भरायचे राहिले असल्याचे सांगण्यात आले. त्यावर चलान का आकारण्यात आले अशी विचारणा प्रमोद यांनी केली. तर, त्यांच्याकडून दंड हेल्मेट न घालता वाहन चालवल्यामुळे आकारण्यात आल्याचे कारण अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितले. पण धक्कादायक बाब ही होती की ट्रक चालवताना हेल्मेट न घातल्यामुळे त्यांना दंड आकारण्यात आला.


परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रमोद कुमार यांनी ही बाब सांगितली, पण त्यांनी काही ऐकले नाही. अखेर पर्याय नसल्यामुळे त्यांनी हेल्मेट न घालता ट्रक चालवल्यामुळे दंड भरला आणि नंतर वाहन परमिट नूतनीकरण केले. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या तीन वर्षांपासून मी ट्रक चालवत असून पाणी पुरवठ्यासाठी ट्रक वापरला जातो. अशात माझ्या ट्रकचे परमिट संपल्यामुळे नूतनीकरण करण्यासाठी परिवहन कार्यालयात गेलो होतो. त्यावेळी मला चलान शिल्लक असल्याचे कळाले, पण ट्रक चालवताना हेल्मेट घातले नाही म्हणून माझ्याकडून दंड आकारण्यात आला होता. लोकांना विनाकारण त्रास देऊन ते पैसे गोळा करत आहेत, असे प्रकार टाळण्यासाठी सरकारने काहीतरी पावले उचलायला हवीत, अशी प्रतिक्रिया प्रमोद यांनी दिली आहे.

The post हेल्मेट न घातल्यामुळे चक्क ट्रक चालकावर कारवाई appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/2NrG9wo
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!