महाराष्ट्र

अशी आहे स्वित्झर्लंडची लोकशाही

Share Now

democrocy
स्वित्झर्लंडला पृथ्वीवरील स्वर्गाची उपमा दिली जाते. निसर्गाचा वरदहस्त लाभलेला हा लहानसा देश जगभरातील पर्यटकांचे आवडते पर्यटनस्थळ आहेच, पण त्याचबरोबर या देशाचे लोकतंत्र ज्या पद्धतीने चालविले जाते ते ‘डायरेक्ट डेमॉक्रसी’चे धोरण या देशाचे वैशिष्ट्य आहे. या देशाच्या राजकीय नेत्यांपैकी प्रत्येकाला देशाचे राष्ट्रपती म्हणून पदभार सांभाळण्याची जबाबदारी स्वीकारावी लागते. देशाच्या काराभारांशी निगडित सर्व निर्णय सर्व राजकीय नेत्यांच्या एकमताने घेतले जातात. तसेच राष्ट्रपतीपदाची जबाबदारी प्रत्येक नेत्याला सांभाळावी लागत असल्याने केवळ कोणा एकाची कायमस्वरूपी सत्ता येथे रहात नाही.
democrocy1
फेडरल काउन्सिलचे सात सदस्य मिळून स्वित्झर्लंडचे सरकार चालवितात. या सर्व सदस्यांना देशाच्या आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि तत्सम तर महत्वाच्या बाबींवर एकत्रितपणे निर्णय घेऊन काम करावे लागते. अशा प्रकारे एकत्रितपणे काम केल्यामुळे एकमेकांचे विचार समजून घेऊन सर्वांना मान्य होतील असे निर्णय घेणे शक्य होऊ शकते. देशाच्या उत्कर्षासाठी मांडण्यात येणाऱ्या नवीन धोरणांचा सर्व बाजूंनी विचार करून मगच त्यांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या फेडरल काउन्सिलची असते.
democrocy2
या देशाच्या राष्ट्रपतींचा कार्यकाल केवळ एका वर्षाचा असतो. या व्यतिरिक्त स्वित्झर्लंडच्या लोकतंत्राचे आणखी एक वैशिष्ट्य असे, की देशाच्या घटनेमध्ये असलेल्या कायद्यांमध्ये अनुकूल बदल सुचविण्याची मुभा सर्व सामान्य नागरिकांना देखील आहे. नागरिकांनी सुचविलेल्या या बदलाला जर बहुमत मिळाले तर हा बदल स्वीकारण्यात येतो. स्वित्झर्लंड ‘डायरेक्ट डेमॉक्रसी’ चा पुरस्कर्ता असून, कोणत्याही बाबतीत जनमत जाणून घेणे हे या देशाच्या सरकारचे प्रमुख धोरण आहे.

The post अशी आहे स्वित्झर्लंडची लोकशाही appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/3cS8AMB
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!