महाराष्ट्र

परम बीर सिंह यांच्या स्वाक्षरी नसलेल्या ईमेल पत्राबाबत शहानिशा

Share Now


मुंबई : गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल परम बीर सिंह यांच्या नावाने मुख्यमंत्री सचिवालयाच्या अधिकृत ईमेलवर काल दुपारी 4.37 वाजता पत्र प्राप्त झाले आहे. paramirs3@gmail.com या ईमेल पत्त्यावरून परम बीर सिंह असे केवळ नाव लिहिलेले व स्वाक्षरी नसलेल्या या पत्राचा ईमेल पत्ता तपासून घेण्यात येत आहे, त्याचप्रमाणे परम बीर सिंह यांना गृहविभागामार्फत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

वास्तविक पाहता परम बीर सिंह यांनी अधिकृतरीत्या आयपीएस अधिकाऱ्यांच्या यादीसाठी दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता parimbirs@hotmail.com असा आहे त्यामुळे काल प्राप्त झालेला ईमेल तपासून घेणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात येते.

The post परम बीर सिंह यांच्या स्वाक्षरी नसलेल्या ईमेल पत्राबाबत शहानिशा appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/3c5SyQj
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!