महाराष्ट्र

खडीसाखरेचे असे ही फायदे

Share Now

sugar
हवामान बदलत असल्याने होणारा सर्दी खोकला ही तक्रार सर्वसामान्यपणे आढळून येत असते. अशा खोकल्याची वारंवार ढास येत असल्यास खडीसाखर चघळण्यास देणे हा साधा उपाय आपण लहानपणापासून पाहत आलो आहोत. या व्यतिरिक्त भोजन झाल्यानंतर बडीशेपेसोबत थोडेशी खडीसाखरही दिली जाते. तोंडातील बॅक्टेरिया नष्ट करून खाल्लेल्या अन्नाचे पचन होण्यास खडीसाखर सहायक असते. खोकल्याची वारंवार ढास येत असेल, तर ती थांबविण्याकरिता कातीच्या लहानशा तुकड्याबरोबर थोडी खडीसाखर चघळावी. याने खोकल्याची ढास थांबते व त्याचबरोबर घसा दुखणे किंवा खवखवणेही कमी होते. तसेच थोड्या काळ्या मिरीच्या पावडरसोबत थोडी खडीसाखर आणि तूप असे मिश्रण एकत्र करून रात्री झोपताना काही दिवस नियमित घेतल्यानेही खोकल्यामध्ये आराम पडतो.
sugar1
ज्यांचे हिमोग्लोबिन कमी आहे, व त्यामुळे ज्यांना सतत थकवा येत असतो, अशा व्यक्तींनी खडी साखरेचे सेवन नियमित करावे. त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते, व रक्ताभिसरणही सुधारते. उन्हाळ्यामध्ये उष्णतेने अनेकदा नाकातून रक्त येऊ लागते. अशा वेळी थोडी खडी साखर चघळण्यास दिल्याने ही समस्या दूर होते. वारंवार थकवा जाणवत असल्यास, किंवा सतत तहान लागत असल्यासही खडी साखर चघळावी.

The post खडीसाखरेचे असे ही फायदे appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/3tDJoQQ
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!