महाराष्ट्र

सलमान खुर्शीद यांचा मुस्लिमांना सल्ला; भाजपला फुट पाडण्याची संधी देऊ नका

Share Now


नवी दिल्ली – अल्पसंख्यांक समुदायांसमोर वेगवेगळे मुद्दे उपस्थित करताना काँग्रेसचे वरिष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी सावधान राहण्याचा सल्ला दिला आहे. मुद्दे उपस्थित करताना मुस्लिमांना सतर्क राहणे गरजेचे असून असे केल्यास भारतीय जनता पार्टीला समाजामध्ये फूट पाडण्याची संधी मिळणार नाही, असे खुर्शीद म्हणाले आहेत. राजस्थानची राजधानी असणाऱ्या जयपुरमधील एका कार्यक्रमामध्ये खुर्शीद हे बोलत होते.

सलमान खुर्शीद राजस्थानमधील स्थानिक निवडणुकांमध्ये विजय मिळावलेल्यांच्या सन्मार्थ आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी मुस्लिम समाजातील सर्व गटांनी एकमेकांसोबत राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे मत व्यक्त केले. आपण आपले मुद्दे उपस्थित करताना घाबरुन जाण्याचे कारण नाही. आपण भाग्यवान आहोत की गैरमुस्लिम कायमच आपल्या चिंतेसंदर्भातील मुद्दे उपस्थित करतात. देशातील ऐक्य टिकावण्यासाठी काँग्रेसने कायमच काम केले. पण आज देशाची लोकशाही धोक्यात आहे. आपल्याला यापासून सावध राहत एकत्र राहण्याची गरज असल्याचे खुर्शीद यांनी म्हटले आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआयने दिले आहे.

एका अधिकृत आकडेवारीनुसार १८ कोटींहून अधिक मुस्लिम भारतामध्ये आहेत. धर्माच्या आधारावर मतदारयादी तयार करण्याची परवानगी निवडणूक आयोगाने देत नाही. पण संपूर्ण देशामध्ये लोकसभेच्या २१८ ठिकाणी मुस्लिम मतदारांची संख्या १० टक्क्यांपर्यंत आहे.

मागील काही काळापासून काँग्रेसवर नाराज असणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांनाही माजी केंद्रीय मंत्री असणारे खुर्शीद यांनी सल्ला दिला आहे. पक्षाच्या नेतृत्वावर ज्या नेत्यांनी प्रश्न उपस्थित केला आहे, त्यांनी सध्या स्वत:च स्थान शोधण्याऐवजी इतिहासामध्ये त्यांची दखल कशी घेतली जाईल, यासंदर्भात विचार करण्याची गरज असल्याचे खुर्शीद यांनी म्हटले आहे. काँग्रेसचे माजी खासदार गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसमधील २३ वरिष्ठ नेत्यांनी सार्वजनिक कार्यक्रमामध्ये काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वासंदर्भातील नाराजी व्यक्त केली होती.

याचनंतर खुर्शीद यांनी नाराज नेत्यांना स्पष्ट शब्दांमध्ये आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला होता. सध्या काँग्रेसमध्ये केंद्रीय नेतृत्वाला समर्थन करणारे आणि विरोध करणारे असे दोन गट पडल्याचे चित्र असून खुर्शीद हे केंद्रीय नेतृत्वाला समर्थन करणाऱ्या गटातील नेते आहेत.

The post सलमान खुर्शीद यांचा मुस्लिमांना सल्ला; भाजपला फुट पाडण्याची संधी देऊ नका appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/3f2JNbn
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!