महाराष्ट्र

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 31 मार्चपर्यंत परभणी जिल्ह्यातील एसटी सेवा पुर्णतः बंद

Share Now


परभणी : कोरोनाच्या जिल्ह्यातील वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आंतरजिल्हा आणि जिल्ह्याअंतर्गत एसटी सेवा आजपासून 31 मार्चपर्यंत पुर्णपणे बंद असणार आहे. रोज साधारणतः जिल्ह्यातून 800 ते 900 बस फेऱ्या होत असतात, त्या आता बंद झाल्या असल्यामुळे एसटी महामंडळाला रोज 30 लाखांचे नुकसान सहन करावे लागणार आहे. याशिवाय हॉटेल्स, रेस्टारंट, चहाच्या टपऱ्या, पानपट्टी धारक यांनाही आपली दुकाने बंद ठेवून केवळ पार्सल सुविधा देता येणार आहे. एकूणच वाढत्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील निर्बंध हे अधिकपणे कडक करण्यात आले आहेत.

कोरोनाबाधितांची संख्या परभणी जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे प्रशासनाने कडक पाऊले उचलायला सुरुवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर 18 मार्चला एसटी बसला तब्बल एक लाख रुपयांचा दंड केला होता. परभणी जिल्ह्यात पुन्हा एकदा लाल परीची चाके थांबली आहेत. आजपासुन 31 मार्चपर्यंत एसटी सेवा पुर्णतः बंद करण्यात आली आहे.

The post कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे 31 मार्चपर्यंत परभणी जिल्ह्यातील एसटी सेवा पुर्णतः बंद appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/3f058T3
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!