महाराष्ट्र

शरद पवारांनी अनिल देशमुख यांच्याबाबत केलेले दावे देवेंद्र फडणवीसांनी काढले खोडून

Share Now


मुंबई : शरद पवारांनी अनिल देशमुख यांच्याबाबत केलेले दावे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत खोडून काढले. काही कागदपत्रे सादर करत देवेंद्र फडणवीस यांनी खासगी विमानाने अनिल देशमुख नागपूरहून मुंबईत आल्याचा दावा केला आहे. काल शरद पवार यांना चुकीची माहिती दिली होती. चुकीची माहिती त्यांच्या तोंडून वदवून घेतली गेली. शरद पवार यांचा अनिल देशमुखांचा पाठिशी घालण्याचा प्रयत्न फसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

पोलीस विभागाच्या कागदत्रांनुसार कोरोनाची लागण अनिल देशमुख यांना झाली त्या दरम्यान कुठे कुठे गेले याची माहिती मिळत आहे. पोलिसांच्या माहितीनुसार 17 फेब्रुवारीला अनिल देशमुख सह्याद्री अतिथीगृह येथे येतील. त्यानंतर 24 तारखेला पुन्हा अनिल देशमुख निवासस्थानी जाणार असल्याची माहिती आहे. या कार्यक्रमानुसार ते गेले की नाही याची माहिती नसल्याचेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अनिल देशमुख 15 ते 27 फेब्रुवारी या तारखेदरम्यान आयसोलेशनमध्ये नव्हते. या काळात त्यांना अनेक मंत्री, अधिकारी भेटले आहेत. या काळात अनिल देशमुख यांना कोण कोण भेटले ही माहिती शोधून काढणे सहज शक्य असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

बदल्यांचे रॅकेट असल्याचा आरोप करत ऑडिओ सीडी आणि माजी एसआयडी प्रमुख रश्मी शुक्ला यांचा अहवाल देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केला. बदल्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळे केंद्रीय गृहसचिवांना भेटून आपण मागणी करणार आहे की या प्रकरणाची सीबीआय चौकशी झाली, पाहिजे असे फडणवीस म्हणाले. तसेच बदल्यांचे रॅकेट बाहेर आणणाऱ्या रश्मी शुक्लांना साईडपोस्टिंगला टाकले. कारवाईची मागणी सुबोध जयस्वाल यांनीही केली तीही न झाल्यामुळे ते प्रतिनियुक्तीवर गेले.. त्यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी कारवाई का केली नाही? असा सवालही देवेंद्र फडणवीसांनी विचारला.

The post शरद पवारांनी अनिल देशमुख यांच्याबाबत केलेले दावे देवेंद्र फडणवीसांनी काढले खोडून appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/395hy8e
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!