महाराष्ट्र

इस्रोमध्ये 10 वी, 12 वी पास तसेच डिप्लोमा उमेदवारांसाठी नोकरभरती

Share Now


नवी दिल्ली – फायरमॅन ​ए, फार्मासिस्ट ए आणि लॅब टेक्नीशियन ए या पदांसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत विक्रम साराभाई स्पेस सेंटरने (VSSC) अर्ज मागविले आहेत. या पदांसाठी ज्यांना अर्ज करायचा आहे, असे इच्छुक आणि पात्र उमेदवार 05 एप्रिलच्या आधी इस्रोची अधिकृत वेबसाइट vssc.gov.in किंवा isro.gov.in वर भेट देऊन अर्ज करू शकतात. या नोकर भरतीसाठी दहावी आणि बारावी उत्तीर्ण उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. भरती प्रक्रियेद्वारे निवडलेल्या उमेदवारांना 34,900 रुपयांपर्यंत पगार देण्यात येईल.

एवढ्या पदांसाठी होणार नोकर भरती –

फार्मासिस्ट – 03 पदे

  • शैक्षणिक पात्रता – दहावी पास आणि फार्मसीमध्ये डिप्लोमा
  • वय मर्यादा – किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 35 वर्षे.

    फायरमॅन ​​- 08 पदे

  • शैक्षणिक पात्रता – दहावी पास
  • पात्रता – पुरुष उमेदवाराची उंची 165 सेमी आणि महिला उमेदवाराची उंची 155 सेमी असावी. पुरुष उमेदवाराची छाती 81 ते 86 सेमी असावी.
  • वयोमर्यादा – किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे.

लॅब तंत्रज्ञ – 02 पदे

  • शैक्षणिक पात्रता – दहावी पास आणि डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीची डिग्री असावी
  • वयो मर्यादा – किमान वय 18 वर्षे आणि कमाल वय 35 वर्षे.

तीनही पदांसाठी एससी, एसटीला वयोमर्यादामध्ये 5 वर्षे आणि ओबीसीला तीन वर्षांची सवलत मिळेल.

निवड- फार्मासिस्ट व लॅब टेक्नीशियन पदासाठी लेखी परीक्षा व नंतर कौशल्य चाचणी घेतली जाईल. फायरमॅन पदासाठी शारिरीक कार्यक्षमता चाचणी व लेखी चाचणी घेण्यात येणार आहे.

यासाठी अर्ज फी 100 रुपये आहे. एससी, एसटी, माजी कामगार, दिव्यांग आणि महिलांसाठी अर्ज फी नाही. तर अशाप्रकारे इस्रोद्वारे सरकारी नोकरीच्या संधू उपलब्ध झाल्या आहेत.

The post इस्रोमध्ये 10 वी, 12 वी पास तसेच डिप्लोमा उमेदवारांसाठी नोकरभरती appeared first on Majha Paper.

from ताज्या बातम्या – Majha Paper https://ift.tt/2QmxRXJ
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!