महाराष्ट्र

बॉलिवूडचा ‘खिलाडी’ कुमार कोरोनाच्या विळख्यात

Share Now

आता हळूहळू बॉलिवूड सेलिब्रिटी कोरोनाच्या विळख्यात येताना दिसत आहेत. बॉलिवूडचा खिलाडी कुमार अर्थात अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाली असून याबाबतची माहिती अक्षयने स्वत: ट्वीट करुन दिली आहे. सध्या अक्षय होम क्वॉरंटाईन आहे

ट्वीट करत अक्षय कुमारने सांगितले की, आज सकाळी माझी कोविड 19 टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. मी सर्व प्रोटोकॉल पाळत स्वत:ला आयसोलेट केले आहे. मी घरी क्वॉरंटाईन झालो आहे आणि सर्व आवश्यक वैद्यकीय उपचार घेत आहे. विनंती करतो की माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी त्यांची कोरोना टेस्ट करुन घ्यावी आणि स्वत: ची काळजी घ्यावी.

तत्पूर्वी आलिया भट्ट, रणबीर कपूर, संजय लीला भंसाळी, मनोज बाजपेयी, क्रिती सेनन यांच्यासह अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींना कोरोनाची लागण झाली होती.


Share Now
error: Content is protected !!