महाराष्ट्र

दहावी आणि बारावीच्या परीक्षांबाबत शिक्षण विभागाची उद्या महत्वपूर्ण बैठक

Share Now

मुंबई : देशातील आणि राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पास करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला. आता नववी, दहावी, अकरावी आणि बारावीच्या परीक्षेबाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे सर्व पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. यासंदर्भात शिक्षण विभागाची उद्या महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली असून त्यानंतर दुपारी 12.30 वाजता शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड निर्णयाची घोषणा करतील.

 

पहिली ते आठवीप्रमाणेच नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट पास करण्याबाबत घोषणा उद्याच्या या बैठकीत होण्याची शक्यता आहे. दहावी आणि बारावीच्या परीक्षा मात्र ऑफलाईन पद्धतीनेच घेतल्या जाऊ शकतात.

दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा जर ऑफलाईन पद्धतीने घेतल्या गेल्या तर विकएन्ड लॉकडाऊनच्या वेळी शनिवारी येणाऱ्या पेपरसाठी काय व्यवस्था करता येईल याबाबतही उद्याच्या बैठकीत चर्चा होईल. उद्या शिक्षण विभागातील महत्वाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन निर्णय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड शिक्षण विभागाचा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.


Share Now
error: Content is protected !!