मराठवाडा

धक्कादायक! आता थेट जिल्हाधिकाऱ्यांशी पंगा; फेक अकाऊंट तयार करून मागितले पैसे

Share Now

: सोशल मीडियावर फेक अकाऊंटद्वारे लोकांना फसवणे हा काही नवीन प्रकार राहिला नाही. पण याचा फटका आता थेट अकोला येथील जितेंद्र पापळकर यांना बसला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंटवरून शहरातील प्रतिष्ठित नागरिकांना पैशांची मागणी करण्यात आल्याचं उघड झालं आहे.

अकोल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे फेसबुकवर फेक अकाऊंट तयार करण्यात आले आणि त्या फेक अकाऊंटवरून माजी महापौर अश्विनीताई हातवळणे यांचे चिरंजीव अखिलेश हातवळणे यांना पैसे मागण्यात आले. या संदर्भात अखिलेश हातवळणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली असून पोलिस यंत्रणेकडून अधिक चौकशी करण्यात येत आहे.

‘गुगल पे’वरून पैशांची माग
णी

जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट अकाऊंटवरून तातडीने काम असल्याचं सांगत १२ हजार रुपयांची मागणी करण्यात आली. यासाठी प्रत्यक्ष भेटण्याऐवजी गुगल अकाउंटचा क्रमांकही देण्यात आला होता.

ऑनलाईन सापळा आणि सावधानता!
तंत्रज्ञानाचे अनेक फायदे असले तरीही हे फायदा घेताना खबरदारी घेणंही महत्त्वाचं आहे. याबाबत थोडीशीही चूक झाली तर तुम्हाला मोठं आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. कारण गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर समाजातील प्रतिष्ठित व्यतींपासून ते अगदी सामान्य नागरिकांपर्यंत कुणाच्याही नावाने फेक अकाऊंट केलं जाऊ शकतं. अकाऊंटची खात्री पटावी यासाठी गुन्हेगार संबंधित व्यक्तीच्या वॉलवरील सर्व माहिती फेक अकाऊंटवरही शेअर करतात.

वैद्यकीय कारणासह इतर महत्त्वाची कारणे देत तात्काळ आर्थिक मदतीची मागणी केली जाते. अनेकदा घाईघडबडीत समोरच्या व्यक्तीकडूनही शहानिशा न करता अशा सापळ्याला फसत ऑनलाईन पेमेंटच्या माध्यमातून पैसे दिले जातात. त्यामुळे अशी फसवणूक टाळण्यासाठी अधिक खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/2TKX93F
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!