मराठवाडा

शेतकरी आंदोलन सुरूच; ‘या’ जिल्ह्यात पुन्हा केंद्राच्या कृषी कायद्यांची होळी

Share Now

नगर: केंद्र सरकारने आणलेल्या तीन नव्या कृषी कायद्यांच्या विरोधातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. , महाराष्ट्र राज्य व आयटकच्या वतीने विरोधी तीन काळ्या कायद्यांच्या विरोधात मार्केटयार्ड चौकात कृषी उत्पन्न बाजार समिती समोर शेतकरी विरोधी कायद्याच्या प्रतीची होळी करण्यात आली. गेल्यावर्षी या दिवशी मध्य प्रदेशात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार झाला होता. त्याचे स्मरण करत आजचे इशारा आंदोलन करण्यात आले. ( )

वाचा:
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाकपचे राज्य सहसचिव अॅड. कॉ. , आयटकचे अॅड. कॉ. सुधीर टोकेकर, कामगार संघटना महासंघाचे भैरवनाथ वाकळे, सतीश पवार, फिरोज शेख, दीपक शिरसाठ सहभागी झाले होते. करोना नियमनांचे पालन करून हे आंदोलन करण्यात आले.

वाचा:

गेल्यावर्षी ५ जून २०२० रोजी रोजी केंद्र सरकारने शेतकरी विरोधी काळे कायदे लागू करण्यासाठी अध्यादेश काढले होते. या अध्यादेशाच्या विरोधात अखिल भारतीय किसान सभेसहित सर्व शेतकरी समर्थक संघटना व अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती यांनी राष्ट्रव्यापी आंदोलन सुरू केले. त्याला एक वर्ष पूर्ण होत आहे. या पार्श्‍वभूमीवर शेतकरी विरोधी तिन्ही कृषी कायदे रद्द करा, कृषी निविष्ठा, बि-बियाणे, औषधे जीएसटी मुक्त करा, शेतमालाला हमीभावासाठी कायदा करा, करोना लस सर्वांना मोफत द्या, डिझेल पेट्रोल वरील अबकारी कर कमी करून त्याचे भाव कमी करा, कांदा, बटाटा व इतर कृषी मालाला किमान हमीभाव जाहीर करा या मागण्यांसाठी कृषी कायद्यांच्या प्रती जाळून इशारा दिवस पाळण्यात आला.

मध्य प्रदेशातील येथे हमीभावासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर भाजप सरकारने गोळीबार केला होता. त्यात सहा शेतकरी मरण पावले. त्यानंतरच देशव्यापी शेतकरी आंदोलन उभे राहिले. त्या शेतकऱ्यांना आदरांजली म्हणून रविवारी ६ जूनला संकल्प दिवस पाळला जाणार असल्याचे संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3ikeZVq
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!