मराठवाडा

धुमशान!; नितेश राणे यांच्या ‘त्या’ ट्वीटला शिवसेनेचे मालवणीतूनच प्रत्युत्तर

Share Now

सिंधुदुर्ग: राज्याचे परिवहन मंत्री अॅड. यांना भाजपकडून लक्ष्य करण्यात येत आहे. दोनच दिवसांपूर्वी आमदार यांनी मालवणी भाषेत एक ट्वीट करत परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यावर राणे कुटुंबापुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सातत्याने आव्हान निर्माण करणारे शिवसेना आमदार यांनी जोरदार शब्दांत पलटवार केला आहे. नितेश यांना वैभव नाईक यांनी मालवणीतूनच प्रत्युत्तर दिले आहे. ( )

वाचा:

शिवसेना विरुद्ध राणे कुटुंबीय यांच्यात सिंधुदुर्गच्या पिचवर नेहमीच जंगी सामना रंगत आला आहे. आता मंत्री अनिल परब यांच्यावरून ठिणगी पडली असून आमदार नितेश राणे यांनी केलेल्या एका ट्वीटने या वादाला तोंड फुटले आहे. परब यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी लागोपाठ आरोप केले आहेत. त्यात परिवहन विभागाशी संबंधित एक तक्रारही पुढे आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर नितेश राणे यांनी अनिल परब यांच्या राजीनाम्याची मागणी केली. इज्जत जाऊ नये असे वाटत असेल तर लगेचच राजीनामा देऊन टाका, अशा आशयाचे ट्वीट नितेश यांनी मालवणी भाषेतून केले होते. ‘ओ परबांनू मंत्री पदाचो राजीनामो आजच देऊन टाका. उगाच उद्या “इज्जत” जावुक नको..! आजच उरलीसुरली “लाज” वाचवा.. आयकतास ना..!!’, असे ते ट्वीट होते. त्यावर वैभव नाईक यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनीही मालवणीतूनच नितेश यांना प्रत्युत्तर दिले. मंत्री म्हणून अनिल परब चांगलं काम करत आहेत. मुख्यमंत्री यांचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. तुम्हाला भाजपात कुणी विचारत नाही म्हणून असे आरोप परब यांच्यावर करत आहात. यातून काहीच साध्य होणार नाही उलट परब यांना याहून अधिक चांगली खाती मिळतील, असे नाईक यांनी नितेश यांना सुनावले. त्यामुळे येत्या काळात राणे विरुद्ध शिवसेना या वादाचा नवा अंक चांगलाच रंगेल अशी चिन्हे दिसत आहेत.

वाचा:

वैभव नाईक यांची मालवणीतील प्रतिक्रिया जशीच्या तशी…

‘अनिल परब हे मंत्री म्हणून चांगला काम करतहत. उद्धवजींच्या गळ्यातले ते ताईत बनलेहत. त्यांच्यार उद्धवजींचो पूर्ण विश्वास आसा. नितेश राणे आणि निलेश राणे ह्येंका भाजपमध्ये सध्या कोण विचारत नाय. आपणाक भाजपात जावनय कधीच मंत्रिपद मिळाचा नाय ह्या लक्षात इल्यामुळेच ते आता अनिल परबांच्यार आरोप करत सुटलेहत. ह्या आरोपातसून कायच सिद्ध होवचा नाय. अनिल परबांका ह्यापेक्षाय महत्त्वाची खाती मिळतली. म्हणानच अनिल परब हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले असल्याचो आमका मोठो अभिमान आसा.’

वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fT1RVD
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!