मराठवाडा

गर्दी वाढत राहिली तर…; अजित पवारांनी बारामतीकरांना केले सतर्क

Share Now

बारामती: शहरासह ग्रामीण भागात अजूनही हव्या त्या प्रमाणात रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे हलगर्जीपणा करून चालणार नाही. करोना रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करत शर्थीचे प्रयत्न करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी दिले. ( Ajit Pawar on )

वाचा:

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज घेतला. यावेळी ते बोलत होते. सध्या बारामती शहर व ग्रामीण भागातील रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी होत आहे परंतु हे प्रमाण समाधानकारक नाही. अजून काही प्रमाणात म्हणजेच रुग्णसंख्या कमी आल्याशिवाय बारामती तालुक्यातील निर्बंध शिथील करता येणार नाहीत. जर गर्दी वाढत राहिली तर दिवसाआड एका बाजूची दुकाने चालू ठेवण्याची परवानगी देण्यात येईल. जर रुग्णसंख्या ५ टक्क्यांच्या आत आली तर आपल्याला पूर्णपणे निर्बंध शिथील करता येतील. शासन व स्थानिक प्रशासन करोना प्रार्दुभाव कमी करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. नागरिकांनीही शासनाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. सार्वजनिक ठिकाणी तसेच अन्यत्र गर्दी होणार नाही आणि सुरक्षित अंतर राखले जाईल याची सर्वांनीच दक्षता घेणे आवश्यक आहे, असे अजित पवार म्हणाले. लसीकरणाचे योग्य नियोजन करावे. रुग्णांसाठी इंजेक्शनचेही योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. कोविडशी लढण्याकरिता आवश्यक असणाऱ्या वैद्यकीय साधन सामुग्री तसेच औषधे, ऑक्सिजनचे योग्य प्रकारे नियोजन करण्याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी, अशा सूचनाही अजित पवार यांनी दिल्या.

वाचा:

उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांनी प्रशासनाच्यावतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तालुक्यामधील शहर व ग्रामीण भागातील करोना नियंत्रणासाठी उपाययोजना तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी, ऑक्सिजन, म्युकरमायकोसिस आजारावरील औषधांचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत त्यांनी तपशील दिला. यावेळी बारामती नगरपरिषद नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, पंचायत समितीच्या सभापती निता फरांदे, उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, पंचायत समिती उपसभापती रोहित कोकरे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे व अन्य अधिकारी-पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, स्टेट बँक ऑफ इंडिया फाउंडेशनच्यावतीने बारामती येथील शासकीय रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयासाठी दोन रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आल्या. त्याचा लोकार्पण सोहळा अजित पवार यांच्या हस्ते पार पडला.

वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3po181K
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!