मराठवाडा

लोकलवरील निर्बंधांबाबत मोठी बातमी; मुंबई महापालिकेला मिळाली ‘ही’ पॉवर

Share Now

मुंबई: राज्यात येत्या सोमवारपासून प्रक्रिया सुरू होत आहे. त्यासाठी आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता या आधारावर पाच स्तर (लेव्हल) निश्चित करण्यात आले आहेत. यात सध्याची स्थिती पाहता मुंबईचा समावेश लेव्हल-३ मध्ये असल्याने तूर्त लोकलसेवेवरील निर्बंध कायम राहणार आहेत, हे स्पष्ट झाले आहे. त्यातही आज सरकारने एक स्पष्टीकरण जारी करत केवळ मुंबईच नाही तर संपूर्ण महानगर प्रदेशात लोकल सेवा सुरू करण्याबाबत व निर्बंध कायम ठेवण्याबाबतचा निर्णय एकसमान असेल व हा निर्णय घेईल, असे नमूद केले आहे. लोकलबाबत कोणताही संभ्रम सामान्यांच्या मनात राहू नये या उद्देशाने ही सूचना देण्यात आली आहे. ( )

वाचा:

मुंबईत सध्या सुरू असली तरी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलप्रवासाची मुभा आहे. सर्वसामान्य प्रवाशांना लोकलची दारे बंद करण्यात आलेली आहेत. राज्य सरकारने अनलॉकसाठी ज्या लेव्हल्स तयार केल्यात आहेत त्यात मुंबईचा समावेश लेवल-३ मध्ये असल्याने मुंबईकरांची लोकलकोंडी कायम राहणार आहे. याअनुषंगाने राज्य सरकारने आज एक महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे. अनलॉकबाबतचा आदेश शुक्रवारी मध्यरात्री राज्य सरकारने जारी केला. सोमवारपासून या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे. या आदेशातील लोकलसेवेच्या मुद्द्यावर आज स्पष्टीकरण देण्यात आले. त्यात महत्त्वाची बाब नमूद करण्यात आलेली आहे.

वाचा:

लेव्हल-१, २ आणि ३ मध्ये प्रवासाविषयी निर्बंध घालण्याचे अधिकार संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला देण्यात आलेले आहेत. या अधिकारांच्या अनुषंगाने मुंबई महापालिकेने लोकलमधून प्रवास करण्याबाबत काही निर्बंध आणले असतील तर हे निर्बंध मुंबईसोबतच संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात लागू राहतील. मुंबई महानगर प्रदेशातील अन्य कोणत्याही आपत्ती व्यवस्थापन विभागाला लोकल सेवेवर अन्य काही निर्बंध लावायचे असतील तर त्यांनी मुंबई महापालिकेशी सल्लामसलत करणे आवश्यक असणार आहे. मुंबई महानगर प्रदेशात लोकलवरील निर्बंधांबाबत समानता असावी व प्रवाशांना प्रवासात कोणत्याही प्रकारची आडकाठी येऊ नये यासाठीच या सूचना देण्यात आल्या आहेत.

वाचा:

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3fYPIP7
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!