मराठवाडा

रायगडावरुन संभाजीराजेंची आंदोलनाची हाक; १६ जूनला पहिला मोर्चा काढणार

Share Now

रायगडः मराठा आरक्षणाप्रश्नी राज्य सरकारला ६ जूनपर्यंत अल्टिमेटम देणाऱ्या खासदार संभाजीराजे यांनी आपली भूमिका जाहीर केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास १६ जूनपासून आंदोलन करणार असल्याची घोषणा संभाजीराजे यांनी किल्ले रायगडावरुन केली आहे.

सुप्रीम कोर्टात रद्द झाल्यानंतर भाजपचे खासदार संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ६ जूनपर्यंत आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा निघाला नाही तर थेट रायगडावरुन घोषणा करु असा इशारा संभाजीराजेंनी दिला होता. त्यावरुन आज शिवराज्यभिषेक दिनी संभाजीराजेंनी आंदोलनाची हाक दिली आहे.

आत्तापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला. हो आहे मी संयमी. पण इथून पुढे तुम्ही माझा संयम पाहणार नाहीत. मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय होईल ते होईल. म्हणून आम्ही ठरवलंय की आंदोलन हे निश्चित आहे. असं घणाघात संभाजीराजे यांनी केला आहे. तसंच, छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळापासून येत्या १६ जूनला पहिला निघेल, असा इशारा संभाजीराजेंनी दिला आहे.

मराठा समाजाचा मागण्या मान्य न झाल्यास मुंबई ते पुणे लाँग मार्च काढणार, असा इशाराही संभाजीराजे यांनी दिला आहे. तिथे तुम्हाला लाठी मारायची असेल, तर पहिली लाठी संभाजी राजेला मारावी लागेल. छत्रपतींच्या वंशजावर पहिली लाठी मारावी लागेल. आम्हाला गृहीत धरू नका, असंही त्यांनी म्हटलं आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3vRmYx3
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!