मराठवाडा

ईटकुर येथे बार्टीच्या वतीने वृक्षारोपण पंधरवाढयाचे उद्घाटन

Share Now

🔴हनुमंत पाटुळे
खामसवाडी दि.५(प्रतिनीधी)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी ) पुणे अंतर्गत दि.५जुन रोजी व्रक्षारोपण पंधरवडा उद्घाटन सोहळा ईटकूर येथील प्राथमीक आरोग्य केंद्रात साजरा करण्यात आला.या व्रक्षरोपणाचे आयोजन बार्टीच्या कळंब तालुका समतादूत अर्चना अण्णासाहेब रणदिवे यांनी केले होते. बार्टी च्या वतीने या वर्षी५० हजार झाडे लावण्याची तयारी केली आहे. "लावूनी रोपे, करुनि संवर्धन,मिळेल प्राणवायू ,जपुया पर्यावरण" ! असा नारा दिला आहे.या  व्रक्षारोपण प्रसंगी डॉ. अक्षय सोळुंके,श्री.वेदपाटक, यादव, अजय  बावळे,गुणवंत राक्षे, बार्टीच्या समतादूत अर्चना रणदिवे,प्रकल्प अधिकारी श्री. तुषार कदम यांच्या सह गावातील इतर नागरिक उपस्थित होते.

from माझी बातमी https://ift.tt/3gd3U5Q
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!