मराठवाडा

पत्नी माहेरी गेल्यानंतर आईवरच बलात्कार; आरोपी मुलगा फरार

Share Now

बुलडाणा: आई मुलाच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी संतापजनक घटना बुलडाण्याच्या पिंपळगाव सराई येथे काल (शनिवारी) रात्री घडली आहे. आईवरच ४५ वर्षीय मुलाने अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आईने सकाळी रायपूर पोलिस ठाण्यात जाऊन मुलाविरुद्ध तक्रार दाखल केली. याप्रकरणी आरोपी मुलाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल झाला असून तो सध्या फरार आहे.

आरोपी रायपूर पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पिंपळगाव सराई येथे हमालीचे काम करतो. या भामट्याने आपल्या ६८ वर्षीय आईवरच अत्याचार केला. पत्नी माहेरी गेली असल्याने आई एकटीच घरी असल्याचा फायदा घेत या नराधमाने हे घृणास्पद कृत्य केले.

राहत्या घरामध्ये रात्री दोघे झोपलेले होते, त्यावेळी जन्मदात्या आईवर घराची आतून कडी लावून या नराधमाने अत्याचार केला.

रविवारी सकाळी आईने रायपूर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे. या घटनेची वार्ता गाव आणि परिसरात पसरल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे या भामट्याला एक मुलगा, एक मुलगी असून मुलीचे एक वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. अनेकदा तो दारुच्या नशेत पत्नीस व आईस मारहाण करत असे.

रात्री दुष्कृत्य केल्यानंतर भामटा फरार झाला आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश बरकते यांनी तत्काळ आरोपीला ताब्यात घेण्याच्या सूचना ठाणेदारास दिली. मात्र तोपर्यंत आरोपी फरार झाला होता.

ठाणेदार सुभाष दुधाळ, पोलिस उपनिरीक्षक योगेंद्र मोरे, यशवंत तायडे, शेख कयूम, श्रीकांत यांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला. त्यावरून रायपूर पोलिस स्टेशनला कलम ३७६ दोन एन एफ ५०६ भा द वि प्रमाणे गुन्हा दाखल केला. पुढील तपास ठाणेदार सुभाष दुधाळ करत आहेत.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3uZGUwm
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!