मराठवाडा

तुळजाभवानी महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन उत्साहात संपन्न

Share Now

तुळजापूर,दि.६ जून,
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचेच नव्हे तर अखिल भारत वर्षाचे प्रेरणास्थान आहेत.राष्ट्रनिर्माता असलेल्या या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजे ६ जून १६७४ म्हणजेच शिवराज्याभिषेक दिन होय.याच पवित्र दिवशी शिवकालगणनेला प्रारंभ झाला होता,हा पावन दिवस स्वराज्याची सार्वभौमत्वाची ,स्वातंत्र्याची प्रेरणा देणारा दिवस आहे, आणि म्हणुनच या पावन दिवसाच्या निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.यावेळी प्रा.आशपाक आतार यांच्या हस्ते प्रतिमा पूजनाने छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा.विवेकानंद चव्हाण, कार्यालयीन कर्मचारी गोवर्धन भोंडे, तुकाराम शिंदे यांची उपस्थिती होती.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाला.तसेच या वेळी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सोशल डीस्टसिंगचे यथायोग्य पालन करण्यात आले होते.

from माझी बातमी https://ift.tt/3vWzcVi
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!