मराठवाडा

ॲड.अनिल (तात्या) काळे यांच्या वाढदिवसा निमित्त केमवाडी येथे व्हिटॅमिन सी, बी.कॉप्लेक्स Easibrsathe, Okacet गोळ्यांचे वाटप

Share Now

काटी –
देशभरासह महाराष्ट्रात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात खेड्यापाड्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.महाराष्ट्र शासनाकडून कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.सध्या वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्र्वभूमीवर तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील रहिवासी तथा भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड.अनिल काळे यांच्या वाढदिवसानिमित्त  येथील ॲड.अनिल काळे मित्र परिवाराच्या वतीने शनिवार दि. 5 मे रोजी सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी व रुग्ण कोरोनामुक्त व्हावेत यासाठी शासकीय नियमांचे पालन करीत  केमवाडीतील नागरिकांना घरोघरी जाऊन व्हिटॅमिन सी, बी.कॉम्पलेक्स,Easibrsathe, Okacet गोळ्यांचे वाटप विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ॲड.अनिल काळे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विविध नाविन्यपूर्ण सामाजिक उपक्रम राबविले जातात. या वर्षी कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्र्वभूमीवर नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी या उद्देशाने व्हिटॅमिन सी, बी. कॉम्पलेक्स, Easibrsathe, Okacet गोळ्या वाटपाचा कार्यक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाबद्दल नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
         यावेळी बालाजी काळे,आदित्य काळे, मनोज काशिद, गजू फंड,हरिभाऊ काळे, उमेश काळे, राजेंद्र जाधव,अमोल शिंदे, कुमार शिंदे, रमु चोरकर,राम इतुकदे, हामु काळे, हमू सातपुते, सोमनाथ जाधव, कुलदीप काळे,अमोल फंड, संग्राम धावणे,रवी ताटे आदी मान्यवर उपस्थित होते.

from माझी बातमी https://ift.tt/3x1vzxn
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!