मराठवाडा

तरूणीचा विनयभंग करीत जिवे मारण्याची धमकी, शहर पोलिसात तक्रार दाखल

Share Now

यवतमाळ : शहरातील चांदोरे नगर परिसरात राहणाऱ्या एका ३४ वर्षीय तरूणीला अश्लील शिविगाळ करीत जिवे मारण्याची धमकी देण्यात आली. ही घटना शनिवारी ५ जून रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी शहर पोलिसांनी आशीष उर्फ बगीरा दांडेकर (३५) रा. मेंडकीपुरा यवतमाळ, शुभम बगेल (२६) राधाकृष्ण नगरी, लोहारा, गौरव आणि एका अनोळखी तरूणांविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

शहरातील एक तरूणी कुटूंबीयातील सदस्यासह जेवन करण्यासाठी शनिवारी बाहेर गेली होती. त्यांच्यासोबत अनिकेत गावंडे नामक तरूण देखील होता. दरम्यान जेवन करून घरी आल्यावर घराजवळ आशिष उर्फ बगीरा दांडेकर, शुभम बगेल, गौरव आणि एक अनोळखी तरूण उभे होते.

यावेळी शुभम बघेल याने सदर तरूणीला अनिकेत गावंडे तुझ्यासोबत कसा, माझे त्याच्यासोबत पटत नाही, असे म्हणाला. यावेळी तरूणीने तू मला विचारणारा कोण? म्हटले असता, शुभम याने अश्लील शिविगाळ केली. मात्र, त्या तरूणीने याकडे लक्ष न देता घरात निघून गेली. दरम्यान, आशिष दांडेकर आणि शुभम बघेल यांनी देखील घरात प्रवेश करून आमचे घर आहे, तू येथून निघून जा, नाही तर मारून टाकेल, अशी धमकी दिली.

याप्रकरणी संबंधित तरूणीने दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आशिष उर्फ बगीरा दांडेकर, शुभम बगेल, गौरव आणि एका अनोळखी तरूणांविरूध्द विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे.

from Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times https://ift.tt/3psQeYr
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!