मराठवाडा

कळंब तालूका पत्रकार मंडळा तर्फे ‘मिशन’ वृक्षारोपन उपक्रमाचा शुभारंभ

Share Now

कळंब (माझी बातमी ब्युरो) –
यंदाच्या पावसाळ्यात 'मिशन एक हजार वृक्षारोपण ' या उपक्रमाची सुरुवात कळंब तालुका मराठी पत्रकार मंडळाच्यावतीने वृक्षारोपण करून करण्यात आली.
 कळंब शहराशेजारील जिजाऊ नगर येथे पत्रकार मंडळाचे अध्यक्ष उन्मेष पाटील , उपाध्यक्ष  धनंजय घोगरे  ,सचिव भिकाजी जाधव, पत्रकार , पार्श्वनाथ बाळापूरे , परवेज मूल्ला , राहूल हौसलमल , हनुमंत पाटुळे ,स्फूर्ती फाउंडेशनचे अध्यक्ष शिवाजी गिड्डे पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी  कळंब भाजपचे सरचिटणीस संजय जाधवर, भाजपचे ओबीसी मोर्चाचे जिल्हा  सरचिटणीस परशुराम देशमाने ,सावता माळी, सतिश वैद्य,नंदकिशोर कदम, संभाजी गिड्डे, आनंद तापडिया आदी उपस्थित होते.
  यंदाच्या पावसाळ्यात कळंब शहर व परिसरात एक हजार वृक्ष लावण्याचा उपक्रम पत्रकार मंडळाने हाती घेतला आहे. यासाठी काही सामाजिक कार्यकर्ते, संस्था, लोकप्रतिनिधी  विविध माध्यमातून सहभाग घेणार आहेत. या अंतर्गत झाडे दत्तक देण्याचाही उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे पत्रकार मंडळाचे  अध्यक्ष उन्मेष पाटील व उपाध्यक्ष धनंजय घोगरे यांनी सांगितले.

from माझी बातमी https://ift.tt/3pr1ynY
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!