मराठवाडा

तुळजाभवानी महाविद्यालयात शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांची जयंती उत्साहात संपन्न

Share Now

तुळजापूर,दि ९, जून,
येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक, संकल्पक शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांची १०३ वी जयंती मोठ्या उत्साहात संपन्न झाली.याप्रसंगी मराठी विभाग प्रमुख डॉ शिवाजीराव देशमुख यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले, तसेच त्यांनी शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या जिवनकार्य विषयक माहिती उपस्थितां समोर मांडली , तसेच शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या जयंतीचे औचित्य साधून यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला, वृक्षारोपणामध्ये नारळ,रामफळ, कडुनिंब,बदाम,चाफा,एकझरा ,तगर,स्वास्तिक,रबर,आनंता,करंज,आलमंडा, सप्तपर्णी अशा विविध प्रकारची झाडे लावण्यात आली.याप्रसंगी स्वामी  विवेकानंदाच्या पुतळ्याचे पूजन प्रा.राजकुमार घाडगे आणि प्रा.सतिश वडगावकर यांच्या हस्ते तर शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या पुतळ्याचे पूजन प्रा.डॉ.मेजर वाय.ए.डोके यांच्या हस्ते संपन्न झाले.सदर प्रसंगी प्रा.धनंजय लोंढे,प्रा.आशपाक आतार, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख वरीष्ठ प्रा.विवेकानंद चव्हाण, राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख कनिष्ठ प्रा.जे.बी क्षीरसागर,तर कार्यालयातील सुमेर कांबळे यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.यावेळी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्व योग्य ती खबरदारी घेऊन हा कार्यक्रम घेण्यात आला.सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांचे मार्गदर्शन लाभले.

from माझी बातमी https://ift.tt/3gmSyMt
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!