मराठवाडा

झूम ऑनलाइन “विनियोगा”

Share Now

विनियोग ऑनलाईन योगा या झूम मीटिंगच्या माध्यमातून पुण्यातील निवेदिता गोखले-सावंत यांनी योग आणि ध्यानधारणा चे आत्तापर्यंत बरेच सेशन्स ऑनलाईन स्वरूपात conduct केले आहेत. बऱ्याचदा असं होतं की अशा सेशन्स ला सुरवातीला आपण आवडीने भाग घेतो आणि एक ते दोन सेशन्स पूर्ण झाली की जाईन करणं बंद करतो.. पण सातत्याने आयोजित केल्या जाणाऱ्या या सेशन्स मधून एक विलक्षण प्रसन्नता आणि मन:शांती मिळते. त्यामुळे या ही पुढे या सेशन्स ला नियमित जॉईन करण्याची आतुरता आतूनच निर्माण होते आहे. मध्यंतरी एका सेशन दरम्यान जॉईन केलेल्या एका व्यक्तीने खूप वेगळा अनुभव प्रस्तुत केला. एक मॅडम खूप difficult situation मधून जात होत्या आणि त्यांनी सेशन अटेंड केल्यावर त्यांना खूप रिलॅक्स वाटलं हा त्यांचा अनुभव ऐकूनच खूप जास्त छान वाटलं.

ब्रह्मविद्या आणि सुदर्शन क्रिया, योगा याचा अभ्यास आपल्यातील काही जण किंवा अनेक जणांना त्याबद्दल माहीत असल्याने योगाचे सामर्थ्य आणि त्याची परम अनुभूती किती प्रविष्ट असते याचा अनुभव तर यापूर्वी घेतला आहेच तसेच निवेदिता ताई यांच्या सेशन्स मधून या सर्व गोष्टी ज्या पूर्वी शिकलो होतो त्याच गोष्टींच नव्याने Recollection होतं आणि पुन्हा एकदा अभ्यासू वृत्तीने या सगळ्याकडे पाहण्याची वृत्ती तिच्या सेशन्स मधून अनुभवता येते.

सेशनची सुरुवात करतानाच निवेदिता ताईच्या चेहऱ्यावरच प्रसन्न हास्य बघून खूप छान वाटतं.. जे व्यायाम ती शिकवतेस ते उत्तम असतातच पण ते सगळ्यांना नीट जमतंय की नाही किंवा ते करताना काही त्रास होतोय का यामागे सुद्धा तुझी खूप तळमळ असते. यात मुख्यत्वे अनुलोम विलोम प्राणायाम, Thorasic, Abdominal आणि Yogic Breathing तसेच भस्त्रिका आणि भ्रामरी यांसारख्या अनेक योग क्रिया शिकवल्या जातात. विशेषतः ध्यानधारणा करताना ऊँ नम शिवाय च संगीत सुरू होतं तेव्हा अजूनच प्रसन्न वाटतं आणि सोबतीने ती ज्या काही सूचना करत असते त्यामुळे शरीराच्या त्या त्या अवयवांकडे जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित केलं जातं आणि असा ठरवून श्वासावर लक्ष केंद्रित झाल्याने व सोबत शांत म्युजिक मुळे योगनिद्रा केल्याचीच अनुभूती मिळते व संपूर्ण दिवस सुंदर जातो..

निवेदिता ताई जी sessions conduct करतेस त्याच नाव सुद्धा खरंच खूप यथार्थ आणि मनाला भावणार आहे.. “ViniYoga”.. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून त्याची हेळसांड करणाऱ्या लोकांना एकत्र आणून वाया जात असलेल्या वेळेचा “विनियोग” ती अतिशय उत्तम पद्धतीने घडवून आणत आहे.🤗

फक्त सेशन्स मधून नाही तर सदैव सगळ्यांच्या मदतीसाठी तत्पर असलेल्या निवेदिता ताईचा Approach खूप काही शिकवून जातो. आता तू सुरु केलेला उपक्रम बघून अगदी छान वाटतय आणि तितकेच छान अनुभव सर्वांना येत आहेत. हा खूप स्तुत्य उपक्रम आहे❤️😊 सगळ्यांबद्दल त्यांच्या चांगल्या हेल्थ साठी तुझी धडपड, तळमळ.. सगळ्यांसाठी तिची असलेली आत्मीयता हे बघून खरंच खूप अपार प्रेम तिच्यात भरलेलं आहे🤗 विनियोग साठी निवेदिता गोखले-सावंत यांना खूप खूप शुभेच्छा🙂🙏🏻


Share Now
error: Content is protected !!