देशविदेश मनोरंजन मराठवाडा

बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणी निर्माता करण जोहरला एनसीबीकडून समन्स

Share Now

निर्माता करण जोहरला एनसीबीने बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावले आहे. एनसीबीने याआधीही अनेक बड्या कलाकारांना ड्रग्ज प्रकरणात समन्स बजावले होते. ज्यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण, सारा अली खान यांसारख्या अभिनेत्रींचाही समावेश होता. आता करण जोहरला याप्रकरणी समन्स बजावल्यानंतर त्याच्या अडचणीही वाढण्याची शक्यता आहे. एनसीबीने काही दिवसांपूर्वी ड्रग्ज प्रकरणात अभिनेता अर्जुन रामपाललाही समन्स बजावले होते. एनसीबी गेल्या काही महिन्यांपासून बॉलिवूडशी असलेल्या ड्रग्ज कनेक्शनचा तपास करते आहे. एनसीबीला या प्रकरणात आता करण जोहरकडून माहिती हवी आहे. दरम्यान करण जोहरचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. एनसीबीकडे या संदर्भात एक तक्रार आल्यानंतर ही कारवाई एनसीबीने केली आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार या समन्सला उत्तर देण्यासाठी करण जोहरला निश्चित कालावधी देण्यात आलेला नाही. पण ड्रग्ज प्रकरणाच्या चौकशीत एनसीबीला करण जोहरने सहकार्य करावे, अशी अपेक्षा असल्याचे यामध्ये म्हटले आहे. एनसीबीने बॉलिवूड ड्रग्ज प्रकरणात आत्तापर्यंत ३० पेक्षा जास्त जणांना अटक केली आहे. तसेच रिया चक्रवर्ती, शौविक चक्रवर्ती, दीपिका पादुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर, फिरोज नाडियादवाला, भारती सिंह आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया, अर्जुन रामपाल यांसारख्या बड्या कलाकारांची चौकशी केली आहे.

या प्रकरणात आता एनसीबीला करण जोहरकडून माहिती हवी आहे आणि यासाठी त्याने सहकार्य करावे, असेही एनसीबीने स्पष्ट केले आहे.


Share Now
error: Content is protected !!