मराठवाडा

इयत्ता 12 वीच्या परिक्षा फाॅर्ममध्ये हिंदू-धर्म हा काॅलम समाविष्ट करण्यात यावा – भाजपा युवा मोर्चाची मागणी

Share Now

इकबाल मुल्ला
उस्मानाबाद/प्रतिनिधी
इयत्ता 12 वीच्या परिक्षा फाॅर्ममध्ये हिंदू-धर्म हा काॅलम समाविष्ट करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन भाजपाची मागणी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाकर यांनी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना दिले आहे. या निवेदनात म्हटले आहे कि, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे द्वारा इयत्ता 12 वीचे परिक्षा फाॅर्म भरून घेणे सुरू आहे. सदरच्या अर्जात परिक्षार्थी यांची पुर्ण माहिती भरणे बंधनकारक आहे. सदरच्या फाॅर्ममध्ये काॅलन नं.10 मध्ये वि़द्यार्थी / परिक्षार्थी यांच्या धर्माचा उल्लेख आहे. परंतू सदर काॅलममध्ये अन्य धर्मिर्यांचा उल्लेख आहे. परंतू हिंदू धर्माचा उल्लेख नाही.

हिंदु धर्माच्या जागी फक्त नाॅन मायनाॅरीटी असा शब्द वापरला आहे. सदरचा प्रकार हा जाणून बुजून केलेला दिसत आहे. मंडळामध्ये असलेले हिंदू द्वेश्टे अधिकारी यांनी हा प्रकार केलेला दिसत आहे. देशभरात जाणून बुजून हिंदू धर्माची बदनामी करण्याचा प्रकार होत आहे. त्यांच्या व्यापक शडयंत्राचा हा भाग आहे. वास्तविक नाॅन-मायनाॅरीटी या शब्दाच्या जागी हिंदू असा षब्द असणे आवश्यक आहे. या गोष्टीला जे जबाबदार आहेत. त्यांच्यावर योग्य ती कारवाई होणे आवश्यक आहे.

सदर फाॅर्म मधील काॅलम तातडीने दुरूस्त करून त्यामध्ये हिंदू धर्माचा उल्लेख समाविष्ट करावा दोषी लोकावर तातडीने कायदेषिर कारवाई करावी अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनाच्या प्रति शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य, मुंबई, शिक्षण संचालक, पुणे यांना दिल्या आहेत.

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, अमित कदम, गिरीश पानसरे, सुनिल पुंगडवाले, श्रीराम उंबरे, गणेश इंगळगे, प्रविण सिरसाठे, सचिन लोंढे, राहुल शिदे, सुरज शेरकर, विशाल पाटील, भगवंत गुंड पाटील, प्रसाद मुंडे, ज्ञानेश्वर पडवळ, तेजस गोरे, अक्षय व्यास, यांच्यासह युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


Share Now
error: Content is protected !!