मराठवाडा

पिताश्री श्रीमंतराव रणदिवे प्रतिष्ठाणतर्फे श्री दत्तगुरुंच्या जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन

Share Now

उस्मानाबाद : त्रिलोकीचे स्वामी, भगवान प़पू़श्री गुरुदेव दत्तात्रेय महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त पिताश्री श्रीमंतराव रणदिवे प्रतिष्ठाणच्या वतीने अखंड गुरूचरित्र सप्ताह आयोजित करण्यात आला आहे़

उस्मानाबाद शहरातील पत्रकार धनंजय रणदिवे यांच्या श्री दत्तगुरू निवासस्थानी मागील ५ वर्षांपासून अखंड श्री गुरुदेव दत्तात्रेय महाराज यांचा जन्मोत्सव साजरा केला जात आहे़ यंदा सप्ताहचे सहावे वर्ष असून पिताश्री श्रीमंतराव रणदिवे प्रतिष्ठाणच्या वतीने सप्ताह सोहळा संपन्न होणार आहे़ बुधवारी(दि़२३) सकाळी ११ वा़ कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मंदिराचे महंत प़पू़श्री तुकोजी बुवा यांच्या हस्ते सप्ताहाचा विधीवत शुभारंभ होणार आहे़ दररोज नित्योपचार महापूजा, गुरुचरित्र पारायण तर मंगळवार, दि़२९ रोेजी श्री दत्तगुरुंचा जन्मोत्सव सोहळा दुपारी १२़१५ वा़ होणार आहे़ यावेळी श्री तुळजाभवानी देविजींचे महंत प़पू़ श्री मावजीनाथ बुवा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे़

कोरोनाच्या पार्दूभावामुळे प्रतिवर्षी होणारे ७ दिवस भजन व कीर्तन हा सोहळा यंदा रद्द केला आहे़ त्यामुळे जन्मोत्सव सोहळा व त्यानंतर महाप्रसादाने सप्ताहाची सांगता होणार आहे़ या सोहळ्याचा भाविक-भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन पिताश्री श्रीमंतराव रणदिवे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष धनंजय रणदिवे यांनी केले आहे़


Share Now
error: Content is protected !!