मराठवाडा

एलआयसीतील उत्कृष्ट कार्याबद्दल दिला जाणारा 2020 चा पुरस्कार एमडीआरटी पुरस्कार माळुंब्रा येथील रणजित वडणे यांना जाहीर

Share Now

काटी:-(उमाजी गायकवाड) तुळजापूर तालुक्यातील माळुंब्रा येथील रहिवासी तथा सध्या पुणे वास्तव्यास असलेले रणजित दादा वडणे यांना एलआयसीतील उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा 2020 चा एमडीआरटी हा सर्वोच्च पुरस्कार जाहीर आहे. माळुंब्रा येथील रहिवासी असलेले रणजित वडणे यांनी 2020 मध्ये एलआयसी मध्ये कमी कालावधीत उत्कृष्ट कार्य करुन एलआयसीतील मानाचा समजला जाणारा सर्वोच्च पुरस्कार एमडीआरटी पुरस्कार जाहीर झाला असून उस्मानाबाद जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.त्यांना विकास अधिकारी प्रशांत बोठे यांचे मार्गदर्शन लाभले.

कोरोनाच्या संकट काळामध्ये ग्रामीण व शहरी भागात अनेक कुटूंब विमा संरक्षित करण्याचे काम त्यांनी केले व रणजित वडणे हे ग्रामीण व शहरी परिसरामध्ये आर्थिक सल्लागार म्हणून परिचित आहेत. त्यांनी आजपर्यंत जवळपास 550 पेक्षा जास्त कुटूंबांना विमा संरक्षित केले आहे. रणजित वडणे हे सामाजिक कार्यात सुध्दा पुढे आहेत.

त्यांना सामाजिक कामा निमित्त दोन पुरस्कार मिळाले आहेत.वडणे यांनी अतिशय गरिब कुटूंबांतील दोन मुलींना दत्तक घेतले असून त्यांचे शिक्षणासह राहणे आदी देखभाल करीत आहेत. त्यांना जाहीर झालेल्या पुरस्काराबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.


Share Now
error: Content is protected !!