मराठवाडा

सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंब येथे आरोग्य जनजागृती व मोफत मास्क चे वाटप

Share Now

नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद अंतर्गत नेहरू युवा मंडळ कळंब व ग्राम ऊर्जा फाउंडेशन अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमानाने सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळंब येथे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना कोरोना व तसेच इतर आजाराविषयी माहिती देण्यात आली व मोफत मास्क चे वाटप करण्यात आले. सध्या कोरोना वातावरणातसुद्धा विद्यार्थी चांगले प्रमाणामध्ये शाळेत येत आहेत.

अशावेळी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक माहिती मिळणे आवश्यक आहे. समाजातील अनेक घटक यासाठी काम करत आहेत. नेहरू युवा केंद्र उस्मानाबाद संपूर्ण कोरोना काळात आरोग्यविषयक जनजागृतीचे काम केले आहे. याचाच एक भाग म्हणून व सामाजिक बांधिलकी म्हणून नेहरू युवा मंडळ कळंब आणि ग्राम उर्जा फाउंडेशन अंबाजोगाई यांच्या संयुक्त विद्यमाने एन 95 मास्क मोफत वाटप करण्यात आले. यावेळी नववी ते बारावी च्या सर्व साडेचारशे विद्यार्थ्यांना मोफत मास्क चे वितरण करण्यात आले. याप्रसंगी पोस्टरच्या माध्यमातूनही जनजागृती करण्यात आली.

यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्रीधर भवर सर, उपप्राचार्य मीनाक्षी शिंदे मॅडम, अलका देवरे मॅडम, पाळवदे प्रकाश, मोरे परमेश्वर, बप्पासाहेब शिंदे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन नेहरू युवा मंडळाचे कळंबचे अध्यक्ष तथा शिक्षक भारती संघटनेचे कळंब तालुका अध्यक्ष ज्योतिराम सोनके सर, नेहरू युवा मंडळाचे मार्गदर्शक सदाशिव ढेंगळे, मंडळाचे सचिव कमलाकर शेवाळे, ज्ञानेश्वर तोडकर, प्रा.भागवत गोरे, ग्रामऊर्जा फाउंडेशन अंबाजोगाईचे दादासाहेब गायकवाड, हातागळे अशोक, वैजनाथ इंगोले यांची उपस्थिती होती. यावेळी सोशल डिस्टंसिंग चा वापर करून कार्यक्रम घेण्यात आला.


Share Now
error: Content is protected !!