मराठवाडा

शिक्षक सभासदांना पतसंस्थेच्या वतीने सफारी प्रवासी ट्राँलीबँगचे वाटप कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेचा स्तुत्य उफक्रम

Share Now

कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना प्रत्येक वर्षी १५% लाभांश देऊन शिल्लक राहीलेल्या रक्कमेतून सफारी कंपनीच्या प्रवासी ट्राँली बँगचे वाटप करण्यात आले.

दि.२३ रोजी शिक्षक भवन कळंब येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून गटशिक्षणाधिकारी श्री.परमेश्वर भारती तर सहाय्यक निबंधक श्री बालाजी कटकधोंड यांच्या शुभहस्ते प्रवासी ट्राँलीबँगचे वाटप करण्यात आले या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य शिक्षक संघाचे उपाध्यक्ष सोमनाथ टकले सहकार अधिकारी सतिश पुरी,शिक्षण विस्तार अधिकारी धर्मराज काळमाते,सुशिल फुलारी, मधुकर तोडकर जिल्हा शिक्षक संघाचे कोषाध्यक्ष सुधीर वाघमारे, तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष दत्तात्रय पवार,जिल्हा चिटणीस राजेंद्र बिक्कड जिल्हा महीला आघाडीच्या सरचिटणीस श्रीमती जेमिनी भिंगारे हे उपस्थित होते.

या प्रसंगी बोलतानां सहाय्यक निबंधक श्री कटकधोंड म्हणाले की कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था ही एक राज्यातील पथदर्शी पतसंस्था असून या संस्थेचा जिल्ह्यातील इतर पतसंस्थेनी आदर्श घेणे गरजेचे आहे तर गटशिक्षणाधिकारी श्री भारती आपल्या मनोगतात म्हणाले ही पतसंस्था शिक्षकांच्या प्रगती बरोबरच तालुक्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगती साठी सतत प्रयत्नशील असते.संस्थेचे अध्यक्ष तथा शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष बाळकृष्ण तांबारे म्हणाले की कळंब तालुका शिक्षक सहकारी पतसंस्था ही जिल्ह्यातील शिक्षकांच्या पतसंस्थे पैकी सर्वात जास्त कर्ज वाटप करणारी,सर्वात जास्त लाभांश देणारी,सर्वात जास्त आर्थिक उलाढाल असलेली व सर्वात कमी थकबाकी असलेली ही पतसंस्था आहे. हे सर्व सभासदांच्या अनमोल सहकार्यामुळेच शक्य आहे .संस्थेच्या संचालक मंडळाने काटकसर व पारदर्शी कारभार करुन सभासदांना उच्चांकी १५ टक्के लाभांश देऊन उरलेल्या नफ्यातून सभासदांना सफारी या नामांकित कंपनीची प्रवासी ट्राँलीबँग वाटपाचा निर्णय संचालक मंडळाने घेतला.

राज्य संघाचे उपाध्यक्ष सोमनाथ टकले,सहकार अधिकारी सतिश पुरी व शिक्षण विस्तार अधिकारी सुशिल फुलारी यांनी पण मनोगत व्यक्त केले तर सभासदातून श्री डी.ओ.पवार व श्रीमती राजश्री कुटे यांनी प्रतिक्रिया नोंदवली.

कार्यक्रमास प्रशांत घुटे,उत्रेश्वर शिंदे,मुकूंद नागरे,पोपट बोराडे,किशोर बुरंगे श्री धैर्यशील नरके,यशवंत आगलावे,पिराजी गोरे,अशोक डीकले ,प्रशांत निन्हाळ ,दिलीप पाटील यांच्यासह शिक्षक सभासद व महिला भगिनी मोठ्यासंख्येने उपस्थित होत्या.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष भूषण नान्नजकर ,संचालक शिवराज मेनकुदळे, गणेश कोठावळे , तोफीक मुल्ला,चंद्रकांत शिंदे, सतिश येडके,दशरथ मुंढे, धनाजी अनपट,नागेश टोणगे,श्रीमती वैशाली क्षिरसागर, संतोष ठोंबरे,पांडुरंग वाघ,अविनाश पवार शिवाजी शिंदे ,यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक भक्तराज दिवाने व सुत्रसंचलन श्रीमती ज्योती ढेपे तर आभार सुधीर वाघमारे यांनी मानले.


Share Now
error: Content is protected !!