मराठवाडा

प्रधानमंत्री जनधन खाते उघडून पेठे यांचा वाढदिवस साजरा

Share Now

इकबाल मुल्ला
उस्मानाबाद/प्रतिनिधी

उस्मानाबाद येथील भाजपा कार्यकर्ते अमोल पेठे यांचा वाढदिवस प्रधानमंत्री जनधन खाते उघडून व रुग्णांना फळांचे वाटप करून साजरा करण्यात आला. शहरातील सांजा रोड सिटी पॉइंट परिसरात असलेल्या नागरिकांची विशेषतः महिलांची भारतीय स्टेट बँकेमध्ये प्रधानमंत्री जनधन योजनेंतर्गत खाती उघडण्याचा शुभारंभ भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे, माजी जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी व युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रुग्णालय व कुष्ठधाममधील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले.

जनधन योजनेंतर्गत बँकेत खाते उघडण्याचा कार्यक्रम सलग तीन दिवस सुरू राहणार असून सांजा रोड परिसरातील सर्व महिला व पुरुष यांची खाती अंतर्गत उघडण्यात येणार आहेत. यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य ॲड. खंडेराव चौरे, जिल्हा सरचिटणीस ॲड. नितीन भोसले, जिल्हा उपाध्यक्ष इंद्रजित देवकते, युवा शहराध्यक्ष राहुल काकडे, पांडुरंग लाटे, हरीश चांदणे, गंगीभाई कांबळे, विकास एडके, बबलू शेख, प्रवीण पाठक, श्रीराम मुंबरे व दयानंद वाघमारे आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.


Share Now
error: Content is protected !!