मराठवाडा

सेवावर्धिनी संस्था पुणे व सिमेन्स गमेसा व जनकल्याण समिती लोहारा यांच्यावतीने शहरात मोफत सर्वरोगनिदान शिबिर संपन्न

Share Now

इकबाल मुल्ला
उस्मानाबाद/प्रतिनिधी
लोहारा शहरातील भारतमाता मंदिर येथे सेवावर्धिनी संस्था पुणे,सिमेन्स गमेसा व जनकल्याण समिती लोहारा यांच्या संयुक्त विद्यमाने दि.25 डिसेंबर 2020 रोजी मोफत सर्वराईनिदान व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन दीपक मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख म्हणून समाजसेवक जालिंदर भाऊ कोकणे, नगरसेवक श्रीनिवास माळी, नगरसेवक आरिफ खानापुरे, विजय ढगे, विठ्ठल वचने पाटील, नेताजी शिंदे, शैलेश जटे,भास्कर माने, शंकर जाधव, शहाजी जाधव, दत्तात्रय दाडगुले, मनोज तिगाडे, मुरलीधर होनाळकर, आदी उपस्थित होते.

या शिबिरामध्ये आरोग्य तपासणी करण्यासाठी सोलापूर येथील यशोदीप हॉस्पिटल चे आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद कसबे, सेवावरधिनीचे प्रकल्प समन्वयक अण्णासाहेब तरंगे, सिमेन्स गमे सा कंपनीचे साईड इन्चार्ज अभय बाबर, श्रीमती सत्यभामा कांबळे, मंजुश्री भालके, शिवलीला ढंगापुरे, लखन अमंचे यांनी यांचे सहकार्य लाभले. या आरोग्य शिबिरामध्ये लोहारा शहरातील व परिसरातील ग्रामस्थांची हिमोग्लोबिन व रक्तगट तपासणी व आरोग्य तपासणी करण्यात आली. ज्यांना काही आरोग्याच्या समस्या आहेत त्यांना गोळ्या व औषध देण्यात आले.


Share Now
error: Content is protected !!