मराठवाडा

सलग पाचव्यांदा होणार ग्रामपंचायत बिनविरोध फणेपुर येथील ग्रामस्थांनी केला संकल्प, या गावचा इतर गावांसमोर आदर्श

Share Now

इकबाल मुल्ला
उस्मानाबाद/प्रतिनिधी
ग्रामपंचायतीच्या सलग चार पंचवार्षिक निवडणुका बिनविरोध काढून या परिसरात एक आदर्श निर्माण केलेल्या लोहारा तालुक्यातील फनेपूर गावाने यावेळीही होणारी ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक सलग पाचव्यांदा ही बिनविरोध करण्याचा गावकऱ्यांनी संकल्प केला आहे. लोहारा तालुक्यातील फनेपूर हे अंतर्गत भागात वसलेले 682 लोकसंख्येचे गाव आहे. बहुतांश शिवार हा माळराणाचा असून येथे मजूर व शेतकऱ्याचे संख्या मोठी आहे. येथे सात सदस्यीय ग्रामपंचायत आहे.

निवडणुकीमुळे गावात होणारा मतभेद, पैशाचा चुराडा, टाळून गाव विकासासाठी येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य प्रा. गोविंद काळे, सार्वजनिक बांधकाम विभागात कनिष्ठ अभियंता पदावर कार्यरत असलेले राजेंद्र माळी, माजी सरपंच नागनाथ निंगशेट्टी, पोलीस पाटील राजकुमार भोजने आदींच्या पुढाकाराने गेल्या चार ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीत येथील सर्व समाजातील नागरिक आपले गट- तट प्रतिष्ठान बाजूला सारून एकत्र येत वीस वर्षापासून ग्रामपंचायतीचे पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध विरोध काढून या परिसरात आदर्श निर्माण केला आहे. बिनविरोध मुळे गावचा विकास साधला असून गावात ग्रामपंचायतचे नवीन इमारत, गावात सर्व रस्ते सिमेंट काँक्रीट, गावाला जोडणारे रस्त्याचे डांबरीकरण, भारत निर्माण योजनेतून पाणीपुरवठा योजना, सार्वजनिक सभागृह आदी विकास कामे झाले आहेत. आता होऊ घातलेली पंचवार्षिक निवडणुकीही बिनविरोध काढण्याचा येथील गावकऱ्यांनी संकल्प केला आहे.

निवडणुकीमुळे गावात मतभेद होऊ नये तसेच गावचा सर्वांगीण विकास साधावा यासाठी सर्व समाजाला एकत्र घेऊन सलग चार वेळा गावचे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध काढली आहे. याही वेळेसआम्ही एकत्र येऊन येथील निवडणूक सलग पाचव्यांदा बिनविरोध करण्याचा निर्धार आहे — राजेंद्र माळी, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग उस्मानाबाद


Share Now
error: Content is protected !!