मराठवाडा

ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध होण्यासाठी तामलवाडीचे पं.स.सदस्य शिंदे सरसावले; बिनविरोध ग्रामपंचायतीस पाच लाख विकास निधी देणार

Share Now

काटी:-(उमाजी गायकवाड) कोरोना संकटाच्या काळात ग्रामपंचायत निवडणूका बिनविरोध करण्यासाठी लोकप्रतिनिधी सरसावले असून पारनेरचे आमदार निलेश लंके, जळगाव जिल्ह्यातील पारोळ्याचे आमदार चिमणराव पाटील, उस्मानाबाद कळंबचे आमदार कैलास पाटील यांच्यासह विविध पक्षाच्या नेत्यांनी लाखों रुपयांचं बक्षीस जाहीर केली आहेत. त्याच धर्तीवर तामलवाडी पंचायत समिती गणाचे पंचायत समिती सदस्य दत्ता शिंदे यांनी तामलवाडी पंचायत समिती गणामध्ये होऊ घातलेल्या तामलवाडी, पिंपळा खुर्द,पिंपळा बुद्रुक, देवकुरुळी, सुरतगाव या पाच गावातील ग्रामपंचायत निवडणूक होणार असून ग्रामपंचायत निवडणुकीतील चुरस कमी व्हावी, भांडण तंटा वाढू नये, गावाचा विकास व्हावा, तसेच शासनाचा निवडणुकीत होणारा खर्च वाचावा आणि प्रचार रणधुमाळीपासून गावकरी दुर राहावे आणि गाव विकासाच्या मार्गावर जाईल या हेतूने पंचायत समिती सदस्याचा 15 व्या वित्त आयोगाच्या निधीतून व इतर योजनांच्या माध्यमातून पाच लाखांचा विकासनिधी बिनविरोध येणाऱ्या ग्रामपंचायतला देणार असल्याचे जाहीर केला आहे.

त्याचबरोबर बिनविरोध आलेले गाव आदर्श बनवण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योजना त्या गावात राबवून ते गाव आदर्श बनवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.


Share Now
error: Content is protected !!