मराठवाडा

उस्मानाबाद जिल्हा पेट्रोल पंप चालक / मालक असोसिएशनची बैठक संपन्न

Share Now

इकबाल मुल्ला
उस्मानाबाद/प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्हा पेट्रोल पंप चालक/मालक असोसिएशनची बैठक श्री सिध्दीविनायक हाउस, छत्रपती संभाजी नगर, उस्मानाबाद येथे दि.27 डिसेंबर 2020 रोजी पार पडली. सदरील बैठकीमध्ये संघटनात्मक तसेच व्यावसायिक अनेक विषयावर चर्चा झाली. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये होत असलेल्या अवैध रसायन मिश्रित बायोडिझेल च्या विक्रीबाबत सविस्तर चर्चा झाली. केंद्र शासनाच्या आदेशानुसार पेट्रोल मध्ये इथेनॉलचे प्रमाण 10 % येत आहे, यामुळे वाहनाच्या टाकीत असललेल्या पाण्याच्या संपर्कात येऊन इथेनॉल चे वेगळे रसायन तयार होऊन वाहन धारकांच्या तक्रारी येत आहेत तसेच व्यवसायातील अन्य काही अडचणी संदर्भात लवकरच शिष्ठमंडळ घेऊन मा.जिल्हाधिकारी यांची भेट घेण्याचे ठरले. यावेळी उस्मानाबाद जिल्हा पेट्रोल पंप चालक / मालक असोसिएशनचे अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, बाळासाहेब क्षीरसागर, प्रशांत कुदाळ, गिरीश हंबीरे, अभिजित शेरखाने, वैभव उंबरे, यांच्यासह असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.


Share Now
error: Content is protected !!