मराठवाडा

नाताळ व सलग सुट्यांच्या पार्श्वभूमीवर तिर्थक्षेञ तुळजापूरात श्रीतुळजाभवानी दर्शनासाठी शहरी भागातील भाविका ंची मोठी गर्दी

Share Now

तुळजापूर (प्रविण कदम) तुळजापूर – नाताळ व सलग सुट्यांच्या पार्श्वभूमीवर तिर्थक्षेञ तुळजापूरात श्रीतुळजाभवानी दर्शनासाठी शहरी भागातील भाविका ंची मोठी गर्दी होत आहे ही भाविकांची गर्दी नववर्षाचा प्रथम दिना पर्यत अशीच राहणार आहे. शुक्रवार शनिवार व रविवार या तीन दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. सध्या कोरोना संसर्गजन्य प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर सर्वती दक्षता घेवुन भाविकांना दर्शन दिले जात आहे. नाताळ नंतर शनिवारी रविवार अशी सलग तीन दिवस सुट्या आल्याने शुक्रवार पासुन देवीदर्शनार्थ शहरी भागातील भाविकांचा ओघ सुरु झाला आहे

पहाटे पासुन भाविक दर्शनासाठी गर्दी करीत असुन या पार्श्वभूमीवर श्रीतुळजाभवानी मंदीर संस्थानने अतिरिक्त चार हजार पासेस वाढवले आहेत. सध्या भाविक घाटशिळ रोड १०८धर्मशाळा व शुक्रवार पेठ रेस्ट हाऊस येथील पासेस केंद्रावर गर्दी करीत आहेत.
शुक्रवार रविवारी मंगळवार पोर्णिमा गर्दी चा दिवशी मंदीर सलग बावीस तास दर्शनासाठी खुले ठेवले जात आहे, कडाक्याचा थंडीच्या पार्श्वभूमीवर सकाळी नऊ नंतर दर्शनासाठी भाविक बाहेर पडत असल्याने सकाळी ९ते सांयकाळी ७वाजेपर्यत मंदीर व परिसरात भाविकांची मोठी वर्दळ दिसुन येत आहे. भाविक देविचा कुलधर्म झाल्यानंतर आपल्या पारंपारिक पुजारी कडे भोजन करुन नंतर खरेदी साठी बाजार पेठेत येत असल्याने बाजार पेठ भाविकांनी बहरुन जात आहे. ऐकंदरीत कोरोना नंतर तिर्थक्षेञ तुळजापूर भाविकांची रेलचेल सुरु झाल्याने तिर्थक्षेञी आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.


Share Now
error: Content is protected !!