या रस्त्यावर अपघात होवुन प्राण गेल्यास संबंधित अधिकारी व ठेकेदारावर मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
तुळजापूर – तिर्थक्षेञ तुळजापूर शहरातील वाहतुक कोंडी दूर करण्यासाठी तयार करण्यात आलेला तुळजापूर हुन लातूर रस्त्यावर जाण्यासाठी करण्यात आलेल्या बायपास रस्ता काम तडवळा गावा जवळ अर्धे केल्यानै या रस्त्यावर दररोज अपघात होत असुन यात अनेक वाहनांची नुकसान तर झाली आहेच पण अनेक प्रवाशी यात जखमी झाल्याने हा धोकादायक बनलेला बायपास रस्ता तातडीने करुन प्रवाशांचा जीवाची काळजी घेण्याची मागणी या मार्गावरुन प्रवास करणारे प्रवाशी व वाहने नेणा-या वाहकांन मधुन केली जात आहे.
या अर्धावट कामामुळे या रोडलगत असणाऱ्या शेतकऱ्यांना शेती करणे कठीण बनले आहे. या बाबतीत येथील ग्रामस्थांनी अनेक निवेदने दिले पण याची दखल आजपर्यत घेतली गेली नाही
या बंद पडलेल्या कामास खा ओमराजे निंबाळकर सह अनेक संबंधित अधिकारी यांनी भेट देवुन ही काम सुरु होत नाही त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.ठेकेदार तर गायब झाल्याची चर्चा ग्रामस्थान मधुन केली जात आहे
उस्मानाबाद रस्ता बायपासवरुन तडवळा मार्ग हा रस्ता लातूर कडे जाणाऱ्या रस्त्यास मिळतो यावरील इतर भागातील काम पुर्ण झाले आहे पण तडवळा गावाजवळ असणाऱ्या पुलाजावाळच काम अपुर्ण ठेवल्याने हा पुल रस्ता भाग धोकादायक ठरला आहे या रस्त्यावर विद्युत प्रकाश योञना कार्यान्वित नसल्याने येथे दरारोज राञी अंधाराचे साम्राज्य निर्माण होवुन अपघातघडत आहेत.
विशेष म्हणजे जिथे रस्ता काम थांबवले आहे तिथेविहीर आहे या विहरी पर्यत रस्ता करण्यात आला आहे त्यामुळे उस्मानाबाद लातूर कडे जाणारी वाहने येथुन वेगाने पुढे येतात माञ अचानक पुढेरस्ता नसुन विहरीचा खड्डा असुन तो दिसत नसल्याने येथे असलेल्या टर्न वर सातत्याने गाड्या पलटी होवुन अपघात घडुन दररोज येथे जखमी होत आहेत,
सदरील अर्धवट रस्ता बाबतीत कुणीही आवाज उठवत नसल्याने येथे दिवसेंदिवस अपघात वाढत आहेत पण याकडे कुणीही लक्ष देत नाही
तरी हा रस्ता दुरुस्ती काम तातडीने हाती घ्यावा अन्यथा अपघात होवुन यात कुणाचे प्राण गेले तर संबंधित अधिकारी व ठेकेदार याचा मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी या चालक प्रवाशी व भागातील ग्रामस्थांन मधुन होत आहे.
Add Comment