मराठवाडा

तामलवाडी ग्रामपंचायत वार्तापञ

Share Now

तुळजापूर (प्रवीण कदम)

मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्राचा सरहद्द वर असलेल्या तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी ग्रामपंचायती निवडणूक हा राजकिय दृष्टीने महत्वाची मानली जात असुन सध्या रणधुमाळीस आरंभ झाला आहे. याही निवडणुकीत भाजपा विरुध्द महाविकासआघाडी अशी लढत होण्याचे संकेत मिळत असुन त्यादृष्टीने राजकिय पटलावर हालचालीनी वेग घेतला तुळजापूर सोलापूर रस्ता चा मध्य भागी असणाऱ्या तामलवाडी गावची प्रत्येक निवडणुक ही आजपर्यत वैशीष्ठपुर्ण ठरत आली आहे. येथे आजपर्यत झालेल्या प्रत्येक निवडणुकीत विधमान आराणाजगजितसिंहपाटील व माजीमंञी माजीआ मधुकरराव चव्हाण यांच्या समर्थकातच लढत झाली आहे.या निवडणुकीत काय होणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे या ग्रामपंचायतमध्ये अकरा सदस्य संख्या असून या सर्व जागेसाठी मतदान होणार आहे. या गावामध्ये चार प्रभाग असून 3074 मतदारांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना रंगणार असल्याने कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तामलवाडी ग्रामपंचायतीचा कार्यकाल चार महिन्यापुर्वी संपला होता परंतु कोरोनाचे भयानक संकट आल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपल्याने ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. े. यावेळीची ही निवडणूक रंगतदार होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. काँग्रस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांची राज्यात आघाडी असुन यांची राज्यात सत्ता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडीच्या माध्यमातून लढणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

त्यामुळे महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा असा सामना येथे रंगणार आहे. राजकिय पक्षाच्या चिन्हावर जरी ही निवडणूक नसली तरी ही निवडणूक मोठ्या राजकीय पुढ्यार्यांच्या हस्तक्षेपाशिवाय पार पडतच नाही. 1995 ची निवडणूक सोडली तर तामलवाडी ग्रामपंचायतीवर काँग्रस,राष्ट्रवादीचे वर्चस्व कायम राहिले आहे. परंतु आ. राणा जगजीतसिंह पाटील यानी भाजपामध्ये प्रवेश केल्याने तामलवाडीचे सरपंच, उपसरपंच, बाजार समितीचे संचालक, पं.स.सदस्य, जि.प. सदस्या तसेच राष्ट्रवादीचे काही नेते कार्यकर्ते यानीही भाजपाचे कमळ हातात घेतले आहे. तुळजापुर तालुक्यातील राजकिय दृष्ट्या महत्वाचा मानल्या जाणाऱ्या मोठ्या ग्रामपंचायतीच्या यादीत तामलवाडी ग्रामपंचात गणली जाते एकंदरीत भाजपासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार असुन महाविकास आघाडीचीही प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.

या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रमुख राजकीय पक्षाकडून मोर्चेबांधणी पुर्ण झाली असुन प्रचाराची राळ ही सुरु होणार आहे.


Share Now
error: Content is protected !!