मराठवाडा

श्री बाळुमामाचा पालखी क्रमांक अकरा ला भव्य मिरवणूकिने निरोप

Share Now

तुळजापूर – श्रीबाळुमामा देवालयची पालखी (बग्गा)अकराचे  गोंधळवाडी येथे २२डिसेंबर रोजी  आगमन झाल्यानंतर पाच दिवसाचा मुक्काम नंतर या पालखीची शनिवार दि२६रोजी  गावातुन भव्य दिव्य मिरवणुक काढुन तीला निरोप दिल्यानंतर ते सांगवी काटी येथे मुक्कामी रवाना झाली श्री बाळुमामा देवालय अधमापूर ता करवीर जि कोल्हापूर येथील पालाखी क्रमांक अकरा ही २००५साली निघाली असुन ती महाराष्ट्र सह कर्नाटक राज्यातील अनेक गावात जाणार असुन सलग पंधरा  वर्षा पासुन ही पालखी भ्रमण करीत आहे
या पालखीचे प्रमुख कारभारी सांगोलेकर असुन प्रभारी राजु अनुसे लिंगप्पा हे आहेत.
या पालखीचे सारथ्थ आचार्य बिरुदेव करीत असुन अनिल सोमनाथ हे पुजारी सोबत आहे
श्री बाळुमामा देवालय अदमापूर येथुन 2005 साली निघालेल्या पालखीचे गोंधळवाडी ता तुळजापूर येथे दि22रोजी आगमन झाले त्यानंतर या बाळुमामाचा पालखी पाच
दिवस मोहन लक्षमण मोटे यांच्या शेतात मुक्कामी होते या पाच दिवसाचा कालावधीत दैनदिन पुजा महाप्रसाद वाटप कार्यक्रमानंतर पारंपरिक धनगरी औव्या भारुड परुड अदि पारंपारिक गीतांचा कार्यक्रम संपन्न झाला नंतर या  बाळुमामा पालखीचे शनिवार दि २६रोजी सकाळी बाळुमामा मुर्तीची सकाळी पुजा करण्यात आली  नंतर महाप्रसाद कार्यक्रम झाला तो झाल्यानंतर पारंपारिक वाद्यांचा गजरात या पालखीची गावातुन भव्य मिरवणूक काढण्यात आली यात ढोल झांज परज यावाद्यांचा व ओव्यांचा गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली शेकडो सुवासनी डोक्यावर कलश घेवुन हातात पचारती ताट घेवुन सहभागी झाले होते याभव्य मिरवणूक नंतर ही पालखी सांगवी काटी कडे रवाना झाले .
या चार दिवसाचा काळात बाळुमामाचे हजारो भक्तांनी दर्शन घेतले.

या पालखी सोहळा यशस्वी ते साठी व महाप्रसाद वाटपसाठी रमेश मोटे अनीलकोळेकर सौरभ  शिरगिरे महावीर मोटे हणमंतराव मोटे युवराज माने अप्पा यमगर धनाजी रेड्डी श्रीराम मानेसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Share Now
error: Content is protected !!