मराठवाडा

आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा महिलांना सक्षम बनविण्यासाठी प्रशासन सरसावले

Share Now

प्रतीकात्मक फोटो

तुळजापूर – तालुक्यातील १०३ आत्महत्या ग्रस्त शेतक-यांचा लाभ न घेतलेल्या विधवा महिलांना सर्व शाषकिय योजनांचा लाभ मिळवून देवुन त्यांना आत्मनिर्भार व सक्षम करण्यासाठी महसुल विभाग सरसावला असुन या पार्श्वभूमीवर आत्महत्या ग्रस्त शेतकरी विधवा महिलांनी तलाठी ग्रामसेवक यांच्या कडे सविस्तर माहीती देवुन आत्मनिर्भार बनण्यासाठी प्रशाषणाला सहकार्य करावे असे आवाहन तहसिलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे,

तुळजापूर तालुक्यात 2011ते2020या नऊ वर्षाच्या कालावधीत १४२शेतक-यांनी आत्महत्या केल्या असुन या पैकी फक्त ३९शेतक-यांच्या विधवा महिलांनी विविध शाषकिय योजनांचा लाभ घेवुन आत्मनिर्भार बनण्याचा प्रयत्न केला असुन उर्वरीत १०३शेतक-यांचा आत्महत्या ग्रस्त विधवा महिलांना कुठल्याही शाषकिय योजनांचा लाभ न अधाप पर्यत घेतला नाही .
यांना शाषणाचा सर्व खात्याच्या योजनांचा लाभ मिळवून देवुन त्यांना आत्मनिर्भार व सक्षम बनविण्यासाठी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी महसुल खात्याच्या माध्यमातून संकल्प केला असुन या पार्श्वभूमीवर आत्महत्या ग्रस्तशेतकऱ्यांच्या विधवा महिलांनी शाषणाचा विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तात्काळ तलाठी ग्रामसेवक आपल्या पर्यत आले असता त्यांना
सविस्तर माहीती द्यावी अन्यथा मला संपर्क साधावा असे आवाहन तहसिलदार सौदागर तांदळे यांनी केले आहे.


Share Now
error: Content is protected !!