मराठवाडा

गुलचंद व्यवहारे यांना उजेडाचे मानकरी पुरस्कार.

Share Now

तुळजापूर / प्रतिनिधी

येथील भारतीय जैन संघटना , कल्याण सागर समूह, राष्ट्रतेज सामाजिक संस्था , शिवछत्रपती प्रतिष्ठान , आदी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कोरोना काळात गोरगरीबांना धान्य वाटप , मास्क वाटप, दुष्काळात चारा छावणी ,लेक वाचवा , स्त्री जन्माचे स्वागत आदि विविध सामाजिक कार्य करणाऱ्या व भाजपाचे जिल्हा चिटणीस म्हणून कार्यरत असणारे गुलचंद व्यवहारे यांना ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर सुधा कांकरिया व डॉक्टर प्रकाश कांकरिया यांच्या मानकन्हैया या संस्थेचा ” उजेडाचे मानकरी ” हा पुरस्कार मिळाला आहे या पुरस्काराचे वितरण नगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले , राज्याचे माजी सहकार मंत्री सुभाषबापू देशमुख , बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे , पद्मश्री पोपटराव पवार (हिवरे बाजार) , डॉक्टर सुधाताई कांकरिया , डॉक्टर प्रकाश कांकरिया यांच्या हस्ते दिनांक 27 डिसेंबर रोजी नगर येथे झाले श्री. व्यवहारे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत असुन त्यांचे केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आ.सुजितसिंह ठाकुर , आ.राणाजगजितसिंह पाटील , आ.अभिमन्यू पवार ,भाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळे , प्र.का.सदस्य अँड.मिलींद पाटील , सुधीर (आण्णा )पाटील,अँड. खंडेराव चौरे आदिंनी अभिनंदन केले आहे.


Share Now
error: Content is protected !!