मराठवाडा

नवाब मलिक यांच्या जावयाला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी (Nawab Malik’s son-in-law remanded in judicial custody for 14 days)

Share Now

 मुंबई – ड्रग्जप्रकरणी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना सुनावण्यात आली आहे. खान यांना दिवसभराच्या चौकशीनंतर गेल्या आठवड्यात एनसीबीने अटक केली होती.


समीर खान यांच्यावर अटकेची कारवाई वांद्रे पश्चिम येथून तब्बल २०० किलो एवढ्या मोठ्या प्रमाणावर गांजा एका कुरियरमधून जप्त केल्यानंतर करण्यात आली होती. आज त्यांना एनसीबीने वैद्यकीय चाचणीसाठी नेल्यानंतर न्यायालयात हजर केले. दरम्यान, न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. यासंदर्भात १४ जानेवारी रोजी केलेल्या ट्विटमध्ये नवाब मलिक म्हणाले होते, कोणीही कायद्यापेक्षा मोठा नाही. कोणत्याही भेदभावाशिवाय, तो सर्वांना लागू व्हायला हवा. कायदा त्याच्याप्रमाणे चालेल आणि त्यावर न्यायही मिळेल. माझा आपल्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आणि आदर आहे.

from माझी बातमी https://ift.tt/39D1ZUO
via IFTTT


Share Now
error: Content is protected !!